Press "Enter" to skip to content

योगविद्येच्या सहाय्याने तमिळनाडूतील तरुण आकाशात उडाल्याचे व्हायरल दावे फेक!

योग विद्येच्या (Yoga) सहाय्याने तमिळनाडूमधील एक तरुण आकाशात उडताना आढळला. त्याच्या या अचाट शक्तीकडे पाहून वैज्ञानिकांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे. अशा दाव्यांसह एक व्हिडीओ सोशल मीडियात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Advertisement

‘यह लड़का तमिलनाडु का रहने वाला है इसने योग विद्या के बल पर आसमान में उड़कर कर दिखाया जिससे वैज्ञानिक भी हैरान रह गए ! रामायण और हनुमान जी को काल्पनिक कहने वालों के लिये खुली चुनोती है… !!’

अशा मजकुरासह ५.३६ मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये एक युवक आकाशात उडत असताना दिसत आहे.

फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सऍपवर देखील या दाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक भालचंद्र जोहरी, सुनील जैन, राजेश वाकडे, प्रतिक मानव, साहेबराव माने, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आणि प्रवीण साखरे यांनी सत्यतेची पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

 • व्हायरल व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले असता असे लक्षात आले की हा व्हिडीओ कुणा सामान्य व्यक्तीच्या मोबाईलने शूट केलेले फुटेज नाही. हे विविध प्रोफेशनल कॅमेऱ्यांद्वारे आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेले शॉट आहेत.
 • विविध अँगल्समधून शूट केलेले शॉट, ड्रोन कॅमेऱ्याचे शॉट, लोकांच्या प्रतिक्रिया एकत्र करून प्रोफेशनली एडीट केलेला हा व्हिडीओ आहे.
 • सामान्य नागरिक जेव्हा मोबाईलच्या सहाय्याने समोर घडत असलेली घटना शूट करत असतो तेव्हा त्या ‘अनकट’ व्हिडीओची विश्वासार्हता जास्त मोठी असते. परंतु हा व्हिडीओ नियोजनबद्धरित्या तंत्रज्ञांनी तयार केलेला आहे. त्यामुळे यात छेडछाड करण्यास वाव आहे.
 • व्हायरल दाव्याशी संबंधित कीवर्ड्स टाकले असता व्हिडीओतील तो युवक तमिळनाडू राज्यातील एक जादुगार असल्याचे समजले. त्याचे नाव विग्नेश प्रभू (Vignesh Prabhu) आहे.
 • व्हायरल होत असलेला मूळ व्हिडीओ त्याच्या विग्नेश प्रभू या युट्युब चॅनलवर ८ ऑगस्ट २०१८ रोजी अपलोड करण्यात आला आहे. त्यावेळीही अशाच प्रकारे चमत्कार घडल्याचे सांगणाऱ्या सोशल मिडिया पोस्ट्स आणि बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
 • कुठलाही जादुगार जेव्हा जादू करून जनतेला आश्चर्याचा धक्का देत असतो तेव्हा तो कुठला दैवी चमत्कार नसून त्याची हातचलाखी असते आणि त्यास वैज्ञानिक आधार असतो.
 • अशाच प्रकारे जादुगार विग्नेशच्या आकाशात उडण्याच्या क्रियेमागे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. उडणारी व्यक्ती क्रेन आणि विशिष्ट प्रकारच्या दोरीच्या सहाय्याने आकाशात तरंगत असतो.
Source: Youtube
 • युट्युबवरील व्हिडीओमध्ये आकाशात अधांतरी उडण्याच्या जादूचे रहस्य सांगितले आहे. या अशाप्रकारची जादू केवळ तमिळनाडू किंवा भारतातच होते असे नाही जगभरात विविध देशांतील जादूगारांनी असे प्रयोग करून दाखवले आहेत.
 • या दोऱ्या शरीराला बांधल्या तरीही सहजासहजी दिसू नये म्हणूनच त्या युवकाने अंगावर काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.
 • ही दोरी कम्प्युटर (VFX) च्या मदतीने व्हिडीओमधून गायब केली जाते आणि आपणास ती व्यक्ती अधांतरी लटकल्याचा भास होतो. हीच पद्धत चित्रपटांत मारामारीच्या सिन्ससाठी, सुपर नॅचरल पॉवर्स दाखवण्यासाठी वापरली जाते.
 • मग व्हायरल व्हिडीओमधील लोकांच्या प्रतिक्रियांचे काय? तर याचे सरळ उत्तर म्हणजे ते सर्वसामान्य बघे नव्हते, हा व्हिडिओच नियोजनबद्ध असल्याने त्यातील प्रेक्षक म्हणून आणलेल्या लोकांकडूनही त्या पद्धतीने डायलॉग वदवून घेतले आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की योगविद्येच्या सहाय्याने तमिळनाडूतील तरुण आकाशात उडाल्याचे व्हायरल दावे फेक आहेत. दाव्यासोबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कलाबाजी आहे, योग विद्येची नाही.

हेही वाचा: खरंच केरळच्या गुरुवयूर मंदिराच्या यज्ञकुंडातून निघालेल्या ज्वालांमध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा दिसते का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या ‘9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा