Press "Enter" to skip to content

५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो?

होमिओपॅथीक औषध NAJA 200 चे तीन थेंब जिभेवर टाकल्यास सर्पदंश (snake bite) झालेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, असे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.

Advertisement

काय आहे व्हायरल दावा?

पावसाळ्यात साप बाहेर येतात ते त्यांच्या बिळात पाणी भरल्याने …
➖ साप चावल्यावरचा रामबाण उपाय …🪱🪱🦂🦂
तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विष रक्तात
सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण
शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते
विष आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात
पसरतं. हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.
(परंतू) …
म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच
अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.
त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू
शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता ? 👍 👍 👍
➖ एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.
हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं
नाव आहे NAJA २०० (N A J A ) हे औषध
कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला
मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव
वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये
इतकी आहे. …
NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे. त्या सापाचं
नाव आहे क्रॅक. या सापाचं विष सर्वात घातक
मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष
उतरवण्यासाठी कामात येतं. …
या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ
शकतो. 👍 👍 👍
🌹 🙏 मित्रांनो आपल्या गावाकडील मंडळींना नक्की
शेअर करा 🙏 🌹

#पावसाळ्यात साप बाहेर येतात ते त्यांच्या बिळात पाणी भरल्याने .साप चावल्यावरचा रामबाण उपाय* …तुम्हाला माहिती असेल…

Posted by Wadhona News on Saturday, 12 June 2021
अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक हर्षल अरबाड आणि गुरुप्रसाद पाटील यांनी फेसबुक, व्हॉट्सऍपवर हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

लोकमत‘ने देखील एका बातमीत सर्पदंशावर ‘NAJA 200’ प्रभावी औषध असल्याचा दावा केला आहे.

Source: Lokmat

पडताळणी:

  • २०१८ साली आंध्रप्रदेशातील कृष्णा नावाच्या जिल्ह्यात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्याने प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक पावलं उचलली होती. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने सुब्रमण्येश्वरस्वामी मंदिरात ‘सर्पयागम’ आणि ‘सर्पदोषम निवारण पूजा’ केली होती. अर्थातच अशा अंधश्रद्धाळू वागण्यावर अनेकांनी ताशेरे ओढले होते. या उपायांमध्ये ‘NAJA 200’ या होमिओपॅथिक औषधाच्या पुरवठ्याचा देखील समावेश होता.
  • या औषधाच्या वापराविषयी ‘पूर्वघाट वन्यजीव समाज’चे संस्थापक आणि ‘सेव्ह द स्नेक फाउंडेशन’चे सहसंस्थापक मूर्ती कांतीमहंती यांनी सांगितले की, होमिओपॅथिक औषध रक्तात मिसळायला वेळ लागतो, नाग किंवा घोणस सारख्या विषारी सापांचे विष जेवढ्या वेळात पसरते तेवढ्या वेळात हे ‘NAJA 200’ निकामी आहे. अशा औषधावर अवलंबून राहून वेळ घालवला तर त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.
  • सर्पांवर विस्तृत अभ्यास करणारे आणि आंध्र प्रदेशच्या वन विभागाबरोबर विविध प्रकल्पांवर काम करणारे वन्यजीव तज्ज्ञ रोमुलस व्हिटकर यांनी स्थापन केलेल्या वन्यजीव संशोधन संस्था मद्रास क्रोकोडाईल बँकेचे सहाय्यक क्युरेटर अजय कार्तिक देखील हेच सांगतात की ‘NAJA 200’ हे औषध सर्पदंशावर (snake bite) ईलाज नाही. ‘Anti Venom’ म्हणजेच ‘विष अवरोधक’ औषधेच यावर ईलाज करू शकतात. यासाठी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नाही.
  • लोकमतने बातमी करताना ‘NAJA 200’ ची महती सांगण्यासाठी पुरावा म्हणून ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीचा आधार घेतलाय त्यात ते औषध कसं निकामी आहे हे सांगितलंय. म्हणजे या बातमीचा मूळ पायाच चुकीचा आहे.
  • व्हायरल पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे ‘नाजा’ हे जगातील सर्वात जास्त विषारी मानल्या गेलेल्या ‘क्रॅक’ नावाच्या सापाचे विष आहे का? तर बिलकुल नाही, कारण ‘ब्रिटानिका’च्या माहितीनुसार १० सर्वात जास्त विषारी सापांच्या यादीत असा कुठला ‘क्रॅक’ नावाचा साप येत नाही. ते औषध नागाच्या विषापासून बनवलं जात असल्याची माहिती उपलब्ध आहे.
  • औषधाची किंमत केवळ ५ रुपये सांगण्यात आली आहे. परंतु ‘1mg.com‘वरील माहितीनुसार औषधाची किंमत ९७ रुपये असल्याचे समोर आले. तसेच या औषधाचा उपयोग हृदयाशी संबंधित त्रासांवर, डोके आणि छाती दुखल्यावर करतात अशी माहिती समोर आली. अर्थातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेऊ नये असे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये सर्पदंशावर ‘NAJA 200’ हे होमिओपॅथीक औषध रामबाण उपाय असल्याचे सांगणाऱ्या व्हायरल पोस्ट्स फेक असल्याचे निष्पन्न झाले. जीवघेणी विषबाधा टाळण्यासाठी लवकरात लवकर दवाखाण्यात जाऊन ‘Anti Venom’ घेणं हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे.

हेही वाचा: काय सांगताय? भोपाळमध्ये खरंच ‘होमिओपॅथी’ औषधांनी कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले ?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा