दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) जन्मदिवस पार पडला. मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडीओ बनविण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिवशी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
व्हिडिओमध्ये मोदींच्या नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. व्हिडिओच्या अगदी शेवटी झगमगत्या प्रकाशात न्हाहणाऱ्या काही गगनचुंबी इमारती बघायला मिळताहेत. या इमारतीची क्लिप अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अजूनही हा बघायला मिळतोय. संपूर्ण २.४३ सेकंदाच्या या व्हिडिओच्या २.२३ ते २.२५ मिनिटांच्या कालावधीत ही क्लिप आपण बघू शकता.
भाजपच्या व्हिडिओतील झगमगत्या प्रकाशात न्हाहणाऱ्या इमारतींची क्लिप अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील आहे. विशेष म्हणजे ही क्लिप आताची नसून २०११ मधील आहे.
यूट्यूबवर २९ जानेवारी २०११ रोजी मॅथ्यू जिवोट या युट्यूब चॅनेलवरून हा यासंदर्भातील व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ३.५८ सेकंदाला त्याच इमारती बघायला मिळताहेत, ज्या भाजपच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
दोन्ही व्हिडिओमधील दृश्यांची तुलना केली असता ती सारखीच असल्याचे आम्हाला आढळून आले. दोन्ही व्हिडिओमधील इमारतींमध्ये काहीही फरक नाही. त्या एकच आहेत.
स्टॉक फोटो वेबसाईट अलामीवर देखील आम्हाला या इमारतींचे फोटोज आढळून आले. फोटोचं कॅप्शन आहे, “रात्रीच्या वेळचं लॉस एंजेलिस”
वेगवेगळ्या ठिकाणांवरून मिळालेल्या माहितीनुसार हे सिद्ध झाले आहे की भाजपच्या व्हिडिओमधील क्लिप ही एकतर अमेरिकेतील आहे. शिवाय ती आताची नसून १० वर्षांपूर्वीची आहे.
हेही वाचा- राज्याचा विकास दाखविण्यासाठी योगी सरकारच्या जाहिरातीमध्ये कोलकात्याच्या उड्डाणपुलाचा फोटो!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]