Press "Enter" to skip to content

देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाढ दाखविण्यासाठी भाजपने शेअर केला जुना रिपोर्ट!

भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ग्राफिक शेअर करण्यात आलंय. दावा करण्यात येतोय की कोरोना व्हायरसच्या काळात जग आर्थिक संकटाला तोंड देत असताना भारताने जीडीपीच्या बाबतीत अमेरिका आणि चीनला मागे टाकलंय. २०२० मध्ये जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाढ (highest gdp growth 2020) नोंदविण्यात आलीये.

अर्काइव्ह पोस्ट

ग्राफिक्सनुसार भारताच्या जीडीपीचा दर १.९ राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्या खालोखाल चीन १.२ आणि अमेरिका (-) ५.९ दरासह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले दिसताहेत.

भाजपच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आलेलं हे ग्राफिक्स जवळपास २९०० युजर्सनी रिट्विट केलंय. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील हे ग्राफिक शेअर केलंय.

अर्काइव्ह पोस्ट

हेच ग्राफिक फेसबुकवर देखील शेअर करण्यात येतंय. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचं हे फलित असल्याचं सांगितलं जातंय.

सही समय पर सही फैसले लेने का नतीजा है कि देश की GDP दुनियाँ में सबसे आगे है 👏👌#IndiaFirst #GDP #PMModi

Posted by India First on Saturday, 22 August 2020

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

ग्राफिकच्या खरेखोटेपणाच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम हे आकडे नेमके कुणी दिलेत ते शोधलं. भाजपच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या ग्राफिकचा सोर्स आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असल्याचं सांगण्यात आलंय.

ग्राफिकचा सोर्स समजल्यानंतर आम्ही गुगल सर्चच्या मदतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे देशांच्या जीडीपी वाढीसंदर्भातले अंदाज शोधले. आयएमएफच्या वेबसाईटवर यासंदर्भातली माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता एक गोष्ट लक्षात आली ती अशी की आयएमएफकडून प्रतिवर्षी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्ट’ या नावाने ४ रिपोर्ट्स प्रसिद्ध केले जातात.

वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत, त्यानंतर एप्रिलमध्ये, एप्रिलनंतर जून किंवा जुलै आणि शेवटचा रिपोर्ट ऑक्टोबरमध्ये अशा पद्धतीने आर्थिक तिमाहीनुसार हे अंदाज वर्तविले जातात.

आयएमएफने २०२० मध्ये आतापर्यंत ३ रिपोर्ट्स प्रसिद्ध केले असून त्यापैकी सर्वात ताजा रिपोर्ट जून २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आलाय. या रिपोर्टनुसार चालू वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर (-) ४.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे, तर चीनच्या जीडीपी वाढीचा दर टक्के राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेचा जीडीपी वाढीचा दर (-) ८ राहणे अपेक्षित आहे.

GDP estimate June 2020 report checkpost marathi
Source: International Monetary Fund

त्यानंतर आम्ही आयएमएफचा त्यापूर्वी प्रकाशित झालेला म्हणजेच एप्रिल २०२० मधला रिपोर्ट अभ्यासला. भाजपकडून शेअर करण्यात आलेल्या ग्राफिकमधील आकडेवारी आणि या रिपोर्टमधील आकडेवारी तंतोतंत जुळणारी असल्याचे आमच्या लक्षात आले. या रिपोर्टनुसार भारताचा जीडीपी दर १.९ तर चीन १.२ आणि अमेरिका (-) ५.९ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

GDP estimate April 2020 report checkpost marathi
Source: International Monetary Fund

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की कोरोना काळात भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाढ (highest gdp growth 2020) झाल्याचे सांगण्यासाठी भाजपने आयएमएफच्या एप्रिल २०२० मधील अंदाजाची माहिती देणारं ग्राफिक आताचं म्हणून शेअर करत दिशाभूल केली आहे.

एप्रिल २०२० मध्ये आयएमएफने भारताचा जीडीपी वाढीचा दर १.९ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता मात्र त्यानंतर जून २०२० मध्ये आयएमएफकडून जाहीर करण्यात आलेल्या अंदाजामध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर घटविण्यात आला असून तो (-)४.५ टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे.

आयएमएफकडून पुढील अंदाज ऑक्टोबर २०२० मध्ये घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा- श्रीनगरमधील लाल चौकात फडकला तिरंगा म्हणत भाजप नेते शेअर करताहेत एडिटेड फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा