Press "Enter" to skip to content

काँग्रेसवर वार करताना भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं ‘गणित’ आणि ‘भूगोल’ दोन्हीही चुकलं !

भारत-चीन सीमा तणाव धुमसत असताना काँग्रेस भाजप वादात भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी उडी घेतलीये.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

Advertisement

22 जून रोजी आपल्या एका ट्विट मध्ये जे.पी.नड्डा काय म्हणाले पहा:

“डॉ. मनमोहन सिंग त्याच पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, ज्या पक्षाने असहाय्य होऊन शरणागती पत्करत 43 हजार किलोमीटर भारतीय जमीन चीनला देऊन टाकली.

काँग्रेस काळात न लढताच रणनीतीच्या आणि प्रादेशिक दोन्ही अंगाने शरणागती पत्करली होती. हे सर्वांनी पाहिलंय.

वेळोवेळी आपल्या सैन्याचा अपमानही केलाय.”

पडताळणी:

या ट्विटवर काही लोक नड्डा यांना ट्रोल करत असल्याचं ‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास आलं. आणि नड्डा यांनी मोठा घोळ घातल्याचं समजलं.

काय घोळ घातलाय?

मनमोहन सिंग यांच्यावर तोफ डागण्याच्या जोशात जे.पी. नड्डा यांनी आकडा काहीसा बरोबर लिहिला पण एककात गल्लत केली.

अजून सोपं करून सांगायचं झाल्यास क्षेत्रफळ मोजण्यासाठी ‘चौरस किलोमीटर’ हे एकक वापरायला हवं होतं परंतु त्यांनी केवळ किलोमीटर वापरलं. जे अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं.

याने काय फरक पडला? तर त्याने खूप मोठा घोळ झाला. उदाहरण द्यायचं म्हटलं तर काश्मीर पासून कन्याकुमारी हे अंतर आहे 2856 किमी. म्हणजे भारताची दोन टोकं 2856 किमी एवढी दूर असतील तर नड्डा यांच्या म्हणण्यानुसार 43000 किमी एवढी जमीन भारताने चीनला कुठून आणि कशी दिली असेल?

Map screenshot to show distance between kashmir to kanyakumari
Source: google

नक्की किती जमीन गमावलेली?

मग आता प्रश्न उरतो, मागच्या लढाईत भारताला आपला नेमका किती भूभाग चीनला द्यावा लागला होता? यातही आकडेवारीचा घोळ आहे ‘द विक’च्या बातमी नुसार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण यांनी मार्च,2020 मध्ये संसदेत ही जमीन 38000 चौरस किमी असल्याचं सांगितलं होतं. परंतु केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलावली तेव्हा हा आकडा 43000 चौरस किमी असल्याचं सांगितलं. यावरही काँग्रेसने टीकेची झोड उठवली आणि हे अधिकचे 5000 चौरस किमी हे आता गमावलेली जमीन तर नाहीये ना अशी शंका उपस्थित केली.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणी मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या ट्विटमधील घोळ खरा असल्याचं निष्पन्न झालं. चौरस किलोमीटर म्हणण्या ऐवजी त्यांनी केवळ किलोमीटर लिहून त्यांनी मोठा घोळ घातला असल्याचं स्पष्ट होतंय.

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा