Press "Enter" to skip to content

‘शेतकरी आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, खलिस्तान जिंदाबादचे नारे’ भाजप नेत्यांचे दावे किती खरे?

कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शनं करण्यासाठी पंजाब व हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाची चर्चा जगभर होताना दिसतेय. परंतु यास विरोध करत भाजप नेते या आंदोलनात शेतकरी नसून राजकीय सूडबुद्धीने आंदोलन पेटवले जातेय असा आरोप करत आहेत. तसेच यात खलिस्तानवादी लोक असून त्यांनी पाकिस्तानी झेंडे फडकावले, खलिस्तान जिंदाबादचे नारे दिले असे दावे करत एक व्हिडीओ शेअर केला जातोय. (Pro khalistan slogans in farmer protest)

Advertisement

‘हे शेतकरी आंदोलन आहे का? कॉंग्रेस आणि आपची देशद्रोही भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झालीय. हे दोन्ही पक्ष देशासाठी पाकिस्तानपेक्षा मोठा धोका निर्माण करणारे आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी ते देश तोडायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत.’ अशा शब्दात भाजप दिल्लीचे आयटी सेल प्रमुख पुनीत अगरवाल यांनी ट्विट करत तो व्हिडीओ शेअर केला होता.

farmer protest linked with khalistani Puneet Agarwal tweet checkpost marathi
Source: Twitter/ Archive.is

अर्काईव्ह लिंक

भाजप महिला मोर्चाच्या नेत्या प्रीती गांधी यांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत ‘खलिस्तानवादी घोषणा देणारे, पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे हे खरेच शेतकरी आंदोलन आहे का? हे खरेच शेतकरी आहेत का?’ असे ट्विट केले होते. या दोन्ही नेत्यांनी नंतर आपापले ट्विट डिलीट केले.

farmer protest linked with khalistani preeti gandhi tweet checkpost marathi
Source: Twitter/ Archive.is

अर्काईव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करताना (Pro khalistan slogans in farmer protest) व्हिडीओत दिलेल्या घोषणांचा आधार घेत सर्च केले असता युट्युबवर १५ ऑगस्ट २०१९ रोजी सिकंदर खान या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ व्हायरल व्हिडिओशी तंतोतंत जुळणारा होता. याचाच अर्थ व्हायरल व्हिडीओ आताचा नसून मागच्या वर्षीचा आहे.

याच अनुषंगाने सर्च केले असता सदर घोषणा इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅचच्या दरम्यान दिल्याची ANI या न्यूज एजन्सीची बातमी समोर आली. ६ जुलै २०१९ रोजी ही घटना झाली होती. या घटनेचा शेतकरी आंदोलनाशी काहीएक संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (Pro khalistan slogans in farmer protest) व्हायरल दावे निखालस खोटे असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल पोस्ट्ससोबत शेअर केला जाणारा व्हिडीओ मागच्या वर्षी इंग्लडमध्ये झालेल्या वर्ल्डकप सामन्यांच्यावेळी पाकिस्तानी आणि काही सिखांनी दिलेल्या घोषणांचा आहे. याचा आताच्या शेतकरी आंदोलनाशी काहीएक संबंध नाही. भाजप नेत्यांनी केलेले हे दावे फेक असल्याचे त्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले परंतु तोवर अनेकांनी ते व्हायरल केले होते.

हेही वाचा: मुस्लीम युवक हिंदू वेद-उपनिषदांमध्ये चुकीचे बदल करून प्रकाशित करताहेत?

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा