Press "Enter" to skip to content

भाजप नेत्यांकडून तेलंगणामधील धरणाचा फोटो उत्तर प्रदेशातील म्हणून शेअर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या तीन दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यात बुंदेलखंडमधील 6000 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असलेल्या विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.

Advertisement

भदोईचे आमदार आणि भाजप नेते रवींद्र नाथ त्रिपाठी यांनी ‘भावनी बांध परियोजने’चा फोटो म्हणून एक ग्राफिक शेअर केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योजी यांच्या दौऱ्यात बुंदेलखंडच्या दुष्काळी भागाला सिंचन प्रकल्प मिळणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

अर्काइव्ह

आमदार अवधेश सिंग आणि माजी खासदार हरिओम पांडेय यांनी देखील हेच ग्राफिक ट्विट केलंय.

पडताळणी:

रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला ‘टुरिस्ट मस्ट सी’ या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये भावनी बांध परियोजने’चा म्हणून शेअर केल्या जात असलेल्या फोटोशी साधर्म्य असणारे धरण बघायला मिळाले. व्हिडीओनुसार ते तेलंगणामधील श्रीशैलम धरण (Srisailam dam) आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगलवर श्रीशैलम धरणाचे फोटो शोधले असता असे अनेक फोटोज बघायला मिळाले ज्यावरून भाजप नेत्यांनी शेअर केलेल्या ग्राफिकमधील फोटो श्रीशैलम धरणाचाच असल्याचे स्पष्ट झाले. डेक्कन क्रोनिकलच्या वेबसाईटवर 3 मे 2015 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हा फोटो वापरण्यात आला होता.

Source: Deccan Chronicle

आंध्रफ्रेंड्स नावाच्या वेबसाईटवर देखील हा फोटो प्रसिद्ध करण्यात आलाय. योगी आदित्यनाथ यांनी श्रीशैलम धरण चोरलं असल्याचे त्यात म्हंटलंय. शिवाय आम्हाला काहीच शिल्लक ठेवणार नाहीत का, असा सवाल देखील करण्यात आलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप उत्तर प्रदेशातील विकास योजनांचा म्हणून शेअर केलेला फोटो तेलंगणामधील श्रीशैलम धरणाचा आहे. श्रीशैलम धरण तेलंगणामधील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पर्यटकांकडून नेहमीच या धरणाला भेट देण्यास पसंती दिली जाते.

हेही वाचा- राज्याचा विकास दाखविण्यासाठी योगी सरकारच्या जाहिरातीमध्ये कोलकात्याच्या उड्डाणपुलाचा फोटो!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा