Press "Enter" to skip to content

भाजप नेत्यांकडून ‘तामिळनाडूत कमळ फुलतंय’ म्हणत शेअर केला जातोय एडिटेड फोटो!

सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल फोटोमध्ये काही तरुण एका विजेच्या खांबावर भाजपचा झेंडा लावत असल्याचे बघायला मिळतेय. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी (C.T. Ravi) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ते लिहिताहेत की तामिळनाडूमध्ये कमळ फुलतंय. रवी यांचं हे ट्विट 1000 पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय. 

Advertisement

अर्काइव्ह

दिल्ली भाजपचे नेते रविंदर गुप्ता (Ravinder Gupta) यांनी देखील हा फोटो तामिळनाडूमध्ये कमळ फुलत असल्याच्या दाव्यासह ट्विट केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता बसपा नेत्या शिरीषा स्वेरो अकिनापल्ली यांचे 31 मे 2022 रोजीचे ट्विट मिळाले. या ट्विटमधील फोटोत विजेच्या खांबावर असलेला झेंडा भाजपचा नव्हे, तर बहुजन समाजवादी पार्टीचा असल्याचे बघायला मिळतेय.

आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये अकिनापल्ली लिहितात की आमच्या बंधू आणि भगिनींनी लोकांच्या हृदयावर निळा झेंडा फडकवला आहे. तेलंगणात बहुजन राज्यसभेच्या स्थापनेच्या उद्देश्याने असे लाखो तरुण आर. एस. प्रवीणकुमार यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्यरत आहेत.

तेलंगणातील बसपाचे मुख्य समन्वयक आर. एस. प्रवीणकुमार (RS Praveen Kumar)   यांनी देखील अकिनापल्ली यांचं ट्विट रिट्विट केलं होतं. हे ट्विट रिट्विट करताना आर. एस. प्रवीणकुमार फोटोतील तरुण बसपा तेलंगणाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले होते. तसेच गोरगरिबांची सत्ता स्थापण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणार असल्याचा संकल्प देखील त्यांनी व्यक्त केला होता.

भाजपचा झेंडा येथून घेतलाय:

व्हायरल इमेज रिव्हर्स सर्च केल्यानंतर ‘StarPNG’ या वेबसाईट वर ७ मे २०१९ रोजी अपलोड झाल्याचे दिसले. या दोन्ही झेंड्यांची फडकण्याची पद्धत पाहिली तर आपल्याला सहज लक्षात येईल की दोन्ही झेंडे एकच आहेत.

flag comparison
Source: StarPNG

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप नेत्यांकडून तामिळनाडूमध्ये कमळ फुलत असल्याच्या दाव्यासह शेअर केला जात असलेला फोटो एडिटेड आहे. शिवाय फोटो तामिळनाडूतील नसून तेलंगणामधील आहे. फोटोतील बहुजन समाज पार्टीच्या झेंडा हटविण्यात आला असून त्याठिकाणी एडिटिंगच्या साहाय्याने भाजपचा झेंडा जोडण्यात आला आहे.

हेही वाचा- बॉक्सिंगपटू निखत झरीनचा तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडून तब्बल 50 लाखांचा चेक देऊन गौरव? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा