Press "Enter" to skip to content

अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यासाठी भाजप नेत्याने दिल्लीचे म्हणत वापरले पंजाबचे फोटो!

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यासाठी भाजप नेत्याने दिल्लीचे सांगत वापरला पंजाबमधील तुंबलेल्या पाण्याचा फोटो! (delhi waterlogged tea party)

दिल्ली भाजपचे सरचिटणीस आणि माजी महापौर रवींदर गुप्ता यांनी एक फोटो शेअर केलाय. यात गल्लीमध्ये साठलेल्या पाण्यात एक कुटुंब खुर्च्या टाकून चहा पीत आहे.

Advertisement

सोबत त्यांनी काय कॅप्शन दिलेय पहा:

#दिल्ली के मुख्यमंत्री @ArvindKejriwal जी का दिल से धन्यवाद जिन्होंने #किराड़ी विधानसभा को #लंदन बना दिया। यह देखिए किस प्रकार एक पूरा परिवार #लंदन की गली में बैठकर ” गरमा गरम चाय” और बिस्कुट का आनंद ले रहे है #केजरीवाल जी इससे अच्छे दिन मत दिखाना’

हेच कॅप्शन कॉपी पेस्ट करत अनेकांनी ट्विटरवर सदर फोटोज शेअर केले आहेत.

viral pic claiming flood in delhi
Source: Twitter

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगलवर रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिला तेव्हा १८ जुलै २०१६ म्हणजे तब्बल चार वर्षांपूर्वीचे एक ट्विट आम्हाला सापडले.

आम आदमी पक्षाचे नेते, आमदार गुरमीत सिंह यांचे हे ट्विट आहे. यात त्यांनी तो मूळ फोटो पोस्ट करून पंजाब मधील मानसा जिल्ह्यात अकाली दलाविरुद्ध अनोख्या पद्धतीने आंदोलन करणारे कुटुंब असल्याचे लिहिले आहे.

याच ट्विटच्या खाली पंजाब केसरीची बातमी सुद्धा आहे ज्यात हां फोटो पब्लिश केलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र डागण्यासाठी दिल्लीचे म्हणत भाजप नेत्याने जो फोटो शेअर केलाय तो आताचा नसून २०१६ मधील आहे किंबहुना तो दिल्लीचा नसून पंजाब मधला फोटो आहे.

हेही वाचा: काँग्रेस सरकार विरोधात ‘टीम अण्णा’ आणि भाजप नेत्यांमधील गुप्त मिटिंगचा फोटो लीक?

Team Anna and BJP confidential meeting photo fact check feature image
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा