Press "Enter" to skip to content

भाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील मिठी नदीची दुर्दशा दाखविण्यासाठी शेअर केला फिलिपिन्सचा फोटो!

भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख प्रीती गांधी (Priti Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत अतिशय स्वच्छ नदी आणि बाजूला सुंदर बाग दिसतेय, तर दुसऱ्या फोटोत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक दिसतंय. आपल्या पोस्टमध्ये प्रीती गांधी यांनी या दोन्ही फोटोंची तुलना केलीये.

Advertisement

प्रीती गांधींनी (Priti Gandhi) दावा केलाय की पहिला फोटो गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती नदीचा (Sabarmati River) असून राज्य सरकारने नदीच्या देखभालीवर आणि सुशोभीकरणावर १४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसरा फोटो मुंबईतील मिठी नदीचा (Mithi River) असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बीएमसीकडून यावर १००० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रीती गांधी यांचं ट्विट १००० पेक्षा अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • सर्वप्रथम तर आम्ही प्रीती गांधी पोस्ट केलेले दोन्हीही फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधले. पहिला फोटो आम्हाला ‘साबरमती रिव्हरफ्रंट’च्या वेबसाईटवर मिळाला. शिवाय ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वेबसाईटवर २०१३ मध्ये प्रकाशित बातमीत देखील हा फोटो वापरण्यात आला असल्याचे आढळून आले. म्हणजेच पहिला फोटो साबरमती नदीचाच असल्याचे स्पष्ट झाले. 
  • दुसरा फोटो आम्हाला शटरस्टॉकच्या वेबसाईटवर मिळाला. फोटोच्या डिस्क्रिप्शननुसार हा फोटो फिलिपिन्समधील मनिला शहरातील आहे. गरिबी आणि टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट या फिलिपिन्समधील मोठ्या समस्या आहेत.
  • वेबसाईटनुसार सदर फोटोचे क्रेडिट्स अँटोनिओ अक्विअस या फोटोग्राफरला देण्यात आले आहेत. 
Source: Shutter Stock
  • ‘लोनलीप्लॅनेट’ नावाच्या वेबसाईटवरील एका बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. फिलीपिन्स जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषित देशांपैकी एक आहे. या समस्येवरील उपाय म्हणून प्लॅस्टिकपासून रस्त्यांची निर्मिती करण्याचे प्रयत्न केले जाताहेत.
  • प्रीती गांधींनी यापूर्वी देखील अनेकवेळा अनेक फेक बातम्या आणि फेक दावे केलेले आहेत. इंग्लडमध्ये झालेल्या वर्ल्डकप सामन्यांच्यावेळी पाकिस्तानी आणि काही सिखांनी खलिस्तान जिंदाबादची नारेबाजी केली होती. प्रीती गांधींनी हा व्हिडीओ भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना खलिस्तान समर्थक ठरवले होते. 

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी मुंबईतील मिठी नदीच्या दुरावस्थेचा म्हणून शेअर केलेला फोटो मिठी नदीचा तर नाहीच, तो भारतातील देखील नाही. मूळ फोटो फिलीपिन्समधील मानिला शहरातील आहे.

हेही वाचा- भारताने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड निर्माण केल्याचे सांगणारे केंद्रीय मंत्र्यांचे दावे फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा