Press "Enter" to skip to content

बिहार भाजपच्या मंत्र्याने प्रचारासाठी वापरला हैदराबादच्या उड्डाणपुलाचा फोटो!

बिहार विधानसभा निवडणुकांची धामधूम तेजीत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते सुद्धा प्रचारासाठी गेले आहेत. याच प्रचारादरम्यान बिहार भाजपच्या एका मंत्र्याने मुजफ्फरपूरमधील विकास दाखवणारा एक फोटो शेअर केलाय.

Advertisement

‘काम किया है, काम करेंगे, मुजफ्फरपुर का विकास करेंगे |’ या कॅप्शनसह बिहारचे नगरविकास व गृहनिर्माण मंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी मुजफ्फरपूरच्या रस्त्यालगत पथदिवे म्हणजेच स्ट्रीटलाईट योजना कशी केलीय हे दाखवणारा फोटो शेअर केलाय. मुजफ्फरपुरमध्ये १७,५४५ पथदिवे आम्ही लावले असल्याचा दावा करताना त्यांनी या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो या ग्राफिक्समध्ये जोडलाय.

Suresh kumar sharma shared street light photograph to claim its from Muzaffarpur
Source: Facebook

अर्काईव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी तो फोटो रिव्हर्स इमेजसर्च करून पाहिला तेव्हा हैद्राबादच्या बैरामालगुडा जंक्शनशी संबंधित फोटो असल्याचे समजले. या विषयी सखोल सर्च केल्यानंतर आंध्रप्रदेशचे नगरपालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के टी रामा राव यांचे ट्विट आम्हाला सापडले.

यामध्ये त्यांनी हैद्राबादमधील सदर पुलाचे काम उद्या संपत असल्याचे सांगून हा बैरामालगुड जंक्शनवरील ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल असून याचे बजेट १६.५ कोटी होते असेही नमूद केले आहे.

‘द न्यूज मिनिट’ या वृत्तपत्रानेसुद्धा आपल्या १० ऑगस्ट २०२० रोजीच्या या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाविषयी बातमीमध्येही हाच फोटो वापरला आहे.

Source: The News Minute

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की बिहार भाजपचे मंत्री सुरेशकुमार शर्मा यांनी भाजपने बिहारचा विकास केला हा दावा करण्यासाठी वापरलेला फोटो हैद्राबादच्या उड्डाणपुलाचा आहे. हा फोटो हैद्राबादमधील बैरामालगुड जंक्शन वरील उड्डाणपुलाचा आहे.

हेही वाचा: अटल बोगद्याचा म्हणून भाजप नेते फिरवताहेत अमेरिकेतील बोगद्याचा फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा