Press "Enter" to skip to content

हुक्का बारमधील छाप्यात मुस्लिम तरुणांसोबत १५ हिंदू तरुणी सापडल्याचे दावे चुकीचे!

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये अनेक तरुण-तरुणी दिसताहेत. फोटोसोबतच्या मजकुरानुसार मध्य प्रदेशातील हुक्का बारवर टाकण्यात आलेल्या छाप्यात 30 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 15 मुले आणि 15 मुलींचा समावेश होता. मात्र विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की सर्व मुली हिंदू आणि सर्व मुले मुस्लीम होती.

Advertisement
May be an image of 4 people, people standing and text that says "मध्यप्रदेश के जिस हुक्का बार पर कल छापा पड़ा था, उसमें 30 लोग पकड़ाए हैं, 15 लड़के और 15 लड़कियां| सब लड़कियां खाते पीते घर की हैं, लेकिन देखने वाली बात ये है कि सभी लड़के मुसलमान हैं और सभी लड़कियां हिन्दूहैं एक भी मुस्लिम लड़की नहीं है| यदि किसी को इस बारे में कुछ सोचना हो तो थोड़ा"
Source: Facebook

फेसबुकवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पडताळणी:

फोटो आणि त्यासोबत केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी आम्ही गुगलवर किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला. आम्हाला काही न्यूज पोर्टल्सवर याविषयी बातम्या सापडल्या. या बातम्यांमधून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

घटना खरी:

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ‘ट्रायलॉजी हुक्का लाऊंज’मध्ये बर्थडे पार्टीसाठी जवळपास तीस युवक युवती एकत्र आले होते. त्यांच्याकडे दारूचा आणि हुक्क्याचा साठा सुद्धा होता. यातील बहुतांश तरुण-तरुणी शहरातील नामांकित कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली होती.

आम्हाला IBC24 आणि news18 mp या चॅनल्सवरील १ जुलै २०२० रोजीच्या बातम्या बघायला मिळाल्या. या बातम्यांनुसार संबंधित तरुण-तरुणींनी लॉकडाऊनच्या काळातील ‘कलम 144’ च्या नियमांचे उल्लंघन करत ब्रथडे पार्टीचे आयोजन केले आणि अवैध दारू साठा जमवून ठेवला होता. म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

सर्व मुस्लीम तरुण आणि सर्व हिंदू तरुणी?

व्हायरल पोस्टमध्ये ‘उसमें 30 लोग पकड़ाए हैं,15 लड़के और 15 लड़कियां। सब लड़कियां खाते पीते घर की हैं, लेकिन देखने वाली बात ये है कि सभी लड़के मुसलमान हैं और सभी लड़कियां हिन्दू हैं, एक भी मुस्लिम लड़की नहीं है।‘ असा दावा केला जातोय.

फोटो व्यवस्थितिरित्या निरखून बघितला तरी आपल्या लक्षात येईल की फोटोमध्ये मुलांची संख्या त्यातील मुलींच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक दिसतेय. IBC24 च्या बातमीनुसार तेथे २६ तरुण आणि ७ तरुणी होत्या.

Source: Youtube

याविषयी अजून सखोल संशोधन केल्यानंतर आम्हाला ‘विश्वास न्यूज’च्या पोर्टलवर एक रिपोर्ट मिळाला. रिपोर्टनुसार भोपाळ पोलिसांचे प्रवक्ते नवीन कुमार यांनी अशी माहिती दिली होती की ताब्यात घेण्यात आलेल्या सात मुलींमधील सहा मुली हिंदू होत्या, तर एक मुलगी ख्रिश्चन होती. तर २६ मुलांपैकी १९ मुले मुस्लिम आणि ७ मुले हिंदू होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो सध्याचा नसून साधारणतः सव्वा वर्षांपूर्वीच्या घटनेचा आहे. शिवाय फोटोसोबत फिरविण्यात येत असलेल्या मेसेजमधील दावा देखील चुकीचा आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये १५ तरुण १५ तरुणी नव्हे तर २६ तरुण ७ तरुणी होत्या. यामध्ये हिंदू-मुस्लीम दोन्ही समुदायाच्या तरुण-तरुणींचा सहभाग होता.

हेही वाचा: मराठ्यांना आणि रा.स्व.संघाला तालिबानी घाबरून असल्याचे सांगत व्हायरल होतोय पाकिस्तानचा व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा