Press "Enter" to skip to content

असदुद्दीन ओवैसी यांनी हिंदूंना धमकी दिलेली नाही, व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

हरिद्वार आणि रायपूर येथील धर्म संसदेतील (Dharma sansad) कथित साधूंनी मुसलमानांच्या नरसंहाराचे आवाहन केल्यानंतर आता या भाषणांच्या बचावात भाजप समर्थक आणि नेत्यांकडून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा व्हिडिओ शेअर केला जातोय. दावा केला जातोय की व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवेसी देशभरातील हिंदूंना खुली धमकी देत आहेत.

अर्काइव्ह

भाजप खासदार परवेश वर्मा यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की व्हायरल व्हिडिओची सुरुवातच “मैं तो उन पुलिस के लोगों से कहना चाह रहा हूँ,….” या वाक्याने होताना बघायला मिळतेय. म्हणजेच ओवैसी व्हिडिओत पुढे जे काही बोलताहेत, ते हिंदूंना उद्देशून नाही, तर उत्तर प्रदेश पोलिसांना उद्देशून बोलताहेत. ओवैसी यांची ही धमकी हिंदूंना नाही, तर उत्तर प्रदेश पोलिसांना आहे.

असदुद्दीन ओवैसी यांचा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला समजले की व्हिडीओ ओवैसी यांच्या 12 डिसेंबर 2021 रोजीच्या कानपुर येथील सभेतील आहे. भाषणात ते उत्तर प्रदेश पोलिसांकडून कथितरित्या मुस्लिमांवर केल्या जाणाऱ्या अन्याय-अत्याचारावर बोलत होते. राज्याच्या पोलिसांकडून मुस्लिमांवर केले गेलेले कथित अत्याचार मुस्लिम समाज कायम लक्षात ठेवील.

मुस्लिमांवर कथित अत्याचार करणाऱ्या पोलिसांचा उल्लेख करत ओवैसी म्हणतात, “अल्लाह तुमचा नाश करेल”.

ओवेसींच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. या संपूर्ण व्हिडिओत ओवैसी कुठेही हिंदूंना धमकावत असल्याचे बघायला मिळत नाहीत.

ओवैसी यांनी देखील ट्विट करत आपण हिंसा भडकावणारे किंवा धमकावणारे वक्तव्य केलेले नाही. आपण पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात बोलत होतो, असे सांगत संपूर्ण भाषण पोस्ट केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर असदुद्दीन ओवैसी यांचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओत ओवैसी हिंदूंना धमकावत नाहीयेत, तर ते उत्तर प्रदेश पोलिसांना उद्देशून बोलताहेत.

टीप- असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांसाठी वापरलेली भाषा देखील चुकीची आहे. ‘चेकपोस्ट मराठी’ त्या भाषेचे कदापि समर्थन करत नाही. मात्र ओवेसींनी उत्तर प्रदेश पोलिसांकडून कथितरित्या मुस्लिमांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराविषयी बोलताना दिलेल्या वक्तव्याच्या आधारे ते हिंदू धर्मियांना धमकावत असल्याचा दावा करणे दिशाभूल करणारे आहे. सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे.

हेही वाचा- केरळी मुस्लिमांनी ‘युनायटेड मल्लापूरम’ असा वेगळा देश घोषित करून स्वतःचा पंतप्रधान निवडल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा