Press "Enter" to skip to content

मानव तस्करी प्रकरणातील आरोपीसोबत केजरीवाल यांचा फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोत त्यांच्या बरोबर एक महिला दिसतेय. दावा केला जातोय की फोटोतील महिला मानव तस्करीच्या प्रकरणातील आरोपी प्रभा मिंज (Prabha Minj) असून दिल्ली पोलिसांच्या एटीएसने तिला कालच अटक केले आहे.

Advertisement

‘फेसबुक‘वर हे दावे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

claim of Kejriwal with prabha minj viral image_Checkpost Marathi.jpeg
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. जवाहरलाल साळुंखे आणि प्रवीण साखरे यांनी व्हॉटस्ऍपवर व्हायरल होत असलेले दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही गुगल सर्चची मदत घेतली. आम्हाला दै. जागरणच्या वेबसाईटवर सप्टेंबर २०१८ मध्ये प्रकाशित बातमी मिळाली. बातमीनुसार दिल्ली एटीएसने मानव तस्करीच्या प्रकरणात प्रभा मिंज मुनी नावाच्या महिलेला अटक केली. चौकशी दरम्यान तिने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. 

  • फोटोचा केजरीवाल यांच्याशी असलेला संबंध

व्हायरल फोटोतील महिला प्रभा मिंज हीच आहे, पण फोटो आताचा नसून जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय या फोटो व्यतिरिक्त प्रभा मिंज (Prabha Minj) आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे एकमेकांशी व्यावसायिक किंवा राजकीय संबंध असल्याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

  • फोटो नेमका कधीचा आणि कुठला?  

व्हायरल फोटोबद्दल अधिक शोधाशोध केली असता हाच फोटो आम्हाला भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या २५ सप्टेंबर २०१८ रोजीच्या ट्विटमध्ये मिळाला. या ट्विटमध्ये देखील देखील केजरीवालांवर प्रभा मिंज सोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • कपिल मिश्रा यांच्या ट्विटमध्ये दुसरा एक फोटो आहे, ज्यात ‘सर्वोदय आदिवासी जनकल्याण संस्था’ या संस्थेच्या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेलं बॅनर बघायला मिळतंय.

व्हायरल फोटोतील प्रभा मिंज हिच्यामागील गायिकेचा फोटो आणि बॅनरवर दिसणाऱ्या गायिकेचा फोटो सारखेच असल्याने सध्याचा व्हायरल फोटो याच कार्यक्रमातील असल्याचे स्पष्ट होते.

Kejrival and Prabha Minj shared a stage_Checkpost Marathi
  • व्हायरल फोटोत केजरीवाल यांच्या बरोबर दिसणारी महिला मानव तस्करीच्या प्रकरणातील गुन्हेगार असली तरी, केवळ तेवढ्या एका कारणावरून केजरीवाल यांचे या महिलेशी संबंध होते, असा दावा केला जाऊ शकत नाही. तसे कुठलेही पुरावे नाहीत.

राजकीय नेते,सेलिब्रिटी अनेक वेळा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. तिथे अनेकजण त्यांच्यासोबत फोटो देखील काढतात. त्यातली एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात सापडली म्हणजे त्याचा संबंध थेट त्या नेत्याशी किंवा सेलिब्रिटीशी जोडणे म्हणूनच योग्य नाही.

Narendra Modi pictured with Nirav Modi in Davos
Source: DNA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नीरव मोदी सोबतचे फोटो व्हायरल झाले होते. पण केवळ नीरव मोदीसोबत फोटो आहे, म्हणून त्याच्या गुन्ह्यांमध्ये देखील पंतप्रधान मोदी सहभागी आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे आहेत. व्हायरल फोटोत अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर दिसणारी महिला मानव तस्करीच्या प्रकरणातील गुन्हेगार प्रभा मिंज असल्याचा दावा खरा असला, तरी या महिलेचे केजरीवाल यांच्याबरोबर वैयक्तिक संबंध असल्याच्या दाव्यांना कुठलाही आधार नाही. शिवाय व्हायरल फोटोतील दाव्यांप्रमाणे ही घटना सध्याची नसून जवळपास तीन वर्षांपूर्वीची आहे.

हे ही वाचा- सोनिया आणि राहुल गांधींसोबत ऑक्सिजन काळाबाजार प्रकरणातील आरोपी नवनीत कालरा आहे?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा