Press "Enter" to skip to content

अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का?

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) याचं भाजप, जनसंघासोबत फार जुनं नातं आहे. त्यांची मुळं आरेसेसची आहेत असे सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल स्वतः स्वतः असं म्हणताहेत की, “हमारा जनसंघ का परिवार है. पैदाईशी बीजेपीवाले है हम. मेरे पिताजी जनसंघमें थे, इमर्जन्सीमें जेल गये थे”

Advertisement

दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओचा स्क्रिनशॉट घेऊन गुगल रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिला. वेगवेगळ्या पद्धतीने फिल्टर्स लाऊन पाहिले तेव्हा कुठे या व्हायरल क्लिपचा मूळ व्हिडीओ आमच्या हाती आला.

३ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजेच दिल्ली विधानसभा इलेक्शनच्या आधी NDTV वर शरद शर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीतला हा भाग आहे.

युट्युबवर उपलब्ध असणाऱ्या या मुलाखतीच्या ७.१७ मिनिटाच्या पुढे केजरीवाल काय म्हणत आहेत पहा:

“लेकीन जनता देख रही है. बीजेपीवाला एक चॅनल के उपर बोल रहा था.

बोला जी हमारा जनसंघका परिवार है. पैदाईशी बीजेपीवाले है हम. मेरे पिताजी जनसंघमें थे, इमर्जन्सीमें जेल गये थे. लेकीन इसबार केजरीवालको व्होट दुंगा मै.

उसे पूछा क्युं?

बोले जी मेरा बच्चा सरकारी स्कूलमें पढता है, और इतना बुरा हाल होता था सरकारी स्कुलोका इन्होने मेरे बच्चे का भविष्य बना दिया. बोला अकेला बंदा है काम पे व्होट मांग रहा है. सत्तर साल में किसीने काम पे व्होट नही मांगे.”

Kejriwal NDTV interview youtube screenshot
Source: Youtube

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘ने पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की केजरीवाल यांनी स्वतःचं जनसंघ कनेक्शन स्वतःचं सांगितलं नसून, त्यांनी एका चॅनलवर बोलत असलेल्या, आजवर भाजपला सपोर्ट करणाऱ्या एका व्यक्तीच्या तोंडची वाक्ये सांगितली आहेत. व्हायरल व्हिडीओ सोबत केलेले दावे निखालस खोटे असून व्हायरल क्लिप अर्धवट एडीट केलेली आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती कोविंद यांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराज होऊन पद्म पुरस्कार मागे घेण्याविषयी ट्विट केलेय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा