Press "Enter" to skip to content

भारतात 1400 वर्षांपूर्वी बनविण्यात आली होती कॉम्प्युटरची कलाकृती? वाचा सत्य!

सोशल मीडियावर प्राचीन कलाकृतीचा म्हणून एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये खुर्चीवर बसून कॉम्प्युटरवर काम करणारी एक व्यक्ती बघायला मिळतेय. विशेष म्हणजे ही कलाकृती दगडावर साकारण्यात आल्याचे बघायला मिळतेय. ही कलाकृती 1400 वर्षे जुनी असून लालगिरी मंदिरातील असल्याचे सांगितले जातेय. पल्लव राजे नरसिंह यांनी ही कलाकृती बनविल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता ‘गुडरीड्स’च्या वेबसाईटवर एका पुस्तकाच्या कव्हरवर आम्हाला व्हायरल फोटो बघायला मिळाला. ‘कोसमॉस लॅटिनोस’ या पुस्तकाच्या कव्हरवर हा फोटो वापरण्यात आला आहे. हे पुस्तक 31 जुलै 2003 रोजी प्रकाशित झाले होते. पुस्तकाचे कव्हर राऊल क्रूझ (Raul Cruz) नावाच्या चित्रकाराने बनवले आहे.

पडताळणी दरम्यान ‘स्ट्रेंज हॉरिझन’ नामक वेबसाईटवर आम्हाला हाच फोटो बघायला मिळाला. या वेबसाईटवर देखील फोटोचे श्रेय राऊल क्रूझ यांनाच देण्यात आले आहे. वेबसाइटवर या फोटोला ‘फ्यूचर एन्सेस्टर’ (future ancestors) असे शीर्षक देण्यात आल्याचे बघायला मिळतेय. राऊल क्रूझ 1983 पासून फ्रीलान्स इलस्ट्रेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, मासिके, कॉमिक्ससाठी फोटोज बनवले आहेत.

Strange Horizons Screen Grab
Source: Strange Horizons

आम्हाला राऊल क्रूझ यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील 5 सप्टेंबर 2018 रोजी हा फोटो अपलोड केला गेला असल्याचे बघायला मिळाले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटो 1400 वर्षे जुनी कलाकृती नसून एका व्यावसायिक इलस्ट्रेटरने बनविलेले पुस्तकाचे कव्हर आहे.

हेही वाचा- ‘एस.टी’ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४००० किमी मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा