Press "Enter" to skip to content

‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजने’अंतर्गत देशातील युवकांना ४००० रुपये मिळणार असल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजने’साठी (Pradhanmantri Ramban Suraksha Yojana) नोंदणी चालू आहे. यात नोंदणी करणाऱ्या युवकांना केंद्र सरकारतर्फे ४००० रुपये मिळणार असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

Advertisement

व्हायरल मेसेज:

मैंने तो 4000 रूपये प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना से प्राप्त कर लिए, आप भी अभी रजिस्ट्रेशन करें।
❤
प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना के लिए रजिस्ट्रेशन हो रहा है, इस योजना के अंतर्गत सभी युवाओं को 4000 रूपये की मदद राशि मिलेगी।
👇
निचे दी गयी लिंक से अभी रजिस्ट्रेशन करें
https://pm--ramban-suraksha--yojna-2021.blogspot.com/
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील गिरकर, सतीश तुंगे, मनोहर खैरनार, जागेश्वर धाकटे, महेंद्र कदम, अंबादास जरारे, राहुल सावंत, संजय लोहकरे, संदेश बालगुडे, संजय राजवाडकर, पुरुषोत्तम शर्मा आणि करण गायकवाड यांनी सदर व्हायरल मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या आधीही अशा केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांतून निधी मिळत असल्याचे दावे करणाऱ्या मेसेजसची पोलखोल केली आहे. त्यातही आम्ही सर्वात महत्वाची बाब म्हणून हे दर्शविले आहे की अशा प्रकारच्या मेसेजसोबत असलेली वेबसाईट लिंक पाहूनच आपणास हे मेसेज खरे की खोटे हे समजेल.

कोणत्याही शासकीय वेब अड्रेसमध्ये/ लिंकमध्ये शेवटी शक्यतो ‘.gov.in’ असे असते. व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील लिंकमध्ये ‘.blogspot.com’ असे दिसते आहे. ही ब्लॉगर साईट आहे. अशा वेबसाईट अगदी कुणीही विनाशुल्क तयार करू शकतात. त्यामुळे ही वेबसाईट शासकीय नाही हे सहज ओळखता येते.

या योजनांचे मेसेज अनेक महिन्यांपासून व्हायरल होतायेत. यावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने अधिकृत ट्विटर हँडलमार्फत सदर मेसेज फेक असल्याचे सांगितले. अशी कुठलीही केंद्र शासनाची योजना अस्तित्वात नसल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजने’अंतर्गत (Pradhanmantri Ramban Suraksha Yojana) देशातील युवकांना ४००० रुपये मिळणार असल्याचे दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. अशा कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करून त्यावर वैयक्तिक माहिती देणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

हेही वाचा: ‘एस.टी’ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४००० किमी मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या 9172011480‘ या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा