Press "Enter" to skip to content

आरेसेसचे स्वयंसेवक मुस्लीम महिलेची छेड काढताहेत?

ट्विटरवर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये अनेक मुलांची जमलेली गर्दी आणि त्यामध्ये अडकलेली एक बुरखा घातलेली मुलगी दिसतेय.

Advertisement

गर्दीतील मुलं त्या मुलीची छेड काढत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.

सोशल मिडीयावर दावा करण्यात येतोय की त्या बुरखाधारी महिलेची छेड काढणाऱ्या गर्दीतील तरुण मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (संघी) आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहन करण्यात येतंय.

सबा शेख या अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास ३९०० जणांनी रीट्वीट केलाय. व्हिडीओचे व्ह्यूज सांगतात की तो जवळपास दोन लाख युजर्सनी बघितलाय.  

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी :

आम्ही सर्वप्रथम व्हिडीओच्या काही फ्रेम्स एकत्र करून गुगल रिव्हर्स सर्चच्या सहाय्याने व्हिडीओची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला ‘Media  420’ या बांगलादेशी युट्युब चॅनेलवर ८ नोव्हेंबर २०१८ रोजी टाकण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला.

Credit- YouTube

हाच व्हिडीओ आम्हाला ‘K P A tv’ नावाच्या दुसऱ्या एका बांगलादेशी युट्युब चॅनेलवर १३  नोव्हेंबर २०१८ रोजी अपलोड करण्यात आल्याचं आढळून आलं. मूळ व्हिडिओ ७ मिनिटांचा असून त्यातली मुलं बंगाली भाषेत बोलताना दिसताहेत.   

‘बूम’ने व्हिडीओमधील संवाद देखील डिकोड केले आहेत. त्यानुसार व्हिडीओमध्ये एका ठिकाणी मुलीला तीचं नाव काय? (तोमार नाम की?) ती कुठे राहते ? (बाशा कोठाय?) ती टेकरहाटला राहते का? (बाशा की टेकरहाट?) त्यावर ती टेकरहाटलाच राहत असल्याची होकारार्थक मान ती मुलगी हलवते.

त्यानंतर मग आम्ही टेकरहाट हे स्थान नेमकं कुठे आहे, ते शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी असं समजलं की टेकरहाट हा बांगलादेशातील ढाक्यामधील मदारीपूर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली की व्हिडीओ भारतातील नसून, बांगलादेशमधील आहे.    

वस्तूस्थिती :

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ भारतातला नसून बंगलादेशमधील आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये दिसणारी गर्दी आरेसेस स्वयंसेवकांची असून ते मुस्लीम मुलीची छेड काढताहेत, हे दावे खोटे आहेत.

आरेसेस स्वयंसेवकांचा व्हायरल व्हिडीओशी काहीही संबंध नाही.

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा