सोशल मीडियावर साधू समाजाच्या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला जातोय. दावा करण्यात येतोय की साधू समाज मुंबईकडे कूच करत असून (Sadhus travelling to attack Mumbai) महाराष्ट्र सरकार आता हे वादळ थांबवू शकणार नाही.
साधारणतः २ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ‘हम हिंदू जगाने आए हैं’ हे गाणे वाजत आहे. ‘किनेमास्टर’ या अॅपच्या साहाय्याने हा व्हिडीओ बनविण्यात आल्याचे त्या अॅपच्या लोगोवरून लक्षात येते.
फेसबुकवर इतरही अनेकांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी पडताळणी सुरु केली असता आमच्या लक्षात आले की हाच व्हिडीओ या वर्षीच्या एप्रिलमध्ये देखील व्हायरल झाला होता.
पालघरमधील साधूंच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारविरोधात एल्गार पुकारण्यासाठी साधू समाज मुंबईकडे निघाला (Sadhus travelling to attack Mumbai) असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर जेव्हा हा समुदाय मुंबईत ठाण मांडून बसेल त्यावेळी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि कंपनी यांना कसं अडवेल? असा सवाल त्यावेळी करण्यात आला होता.
एप्रिल २०२० मधल्या व्हायरल पोस्टवरून हा व्हिडीओ जुना असल्याचे तर स्पष्ट झालेच होते. आता फक्त मूळ व्हिडीओ कुठला आहे, हे शोधायचे होते. त्यासाठी आम्ही यांडेक्स रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्सच्या आधारे व्हायरल होत असलेला व्हिडीओ यांडेक्स वर शोधला.
आम्हाला ‘प्रयागराज भ्रमणं’ या युट्यूब चॅनेलवर ११ जानेवारी २०२० रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.
व्हिडीओच्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ २०१९ साली उत्तर प्रदेशातील प्रयागराज अथवा अलाहाबाद येथे भरविण्यात आलेल्या कुंभमेळ्या दरम्यानचा आहे. एका प्रतिष्ठित आखाड्यातील साधूंच्या शाही स्नानाचा हा व्हिडीओ असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
व्हिडीओ अलाहाबाद येथील कुंभमेळ्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही काही किवर्डसह युट्यूबवर सर्च केलं. आम्हाला ‘अपना अवध’ या युट्यूब चॅनेलवर देखील हा व्हिडीओ मिळाला. संबंधित चॅनेलवर हा व्हिडीओ १९ एप्रिल २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी दरम्यान स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ सध्याचा नसून साधारणतः दीड वर्षांपूर्वीचा आहे. व्हिडीओ २०१९ सालात उत्तर प्रदेशातील अलाहाबाद अथवा प्रयागराज येथे भरविण्यात आलेल्या कुंभमेळ्यातील नागा साधूंच्या शाही स्नानाचा आहे.
हे ही वाचा- हिंदू देवतेचा अपमान करणारा हा व्यक्ती मोहमद अंसारी नाही, तर आझाद कुमार गौतम आहे!
Be First to Comment