Press "Enter" to skip to content

युपीएससीच्या निकालात पहिल्या चारही क्रमांकावर मुलीच असल्याच्या बातम्या फेक!

दोन दिवसांपूर्वीच युपीएससीचा निकाल (Upsc Result) लागला. या निकालांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारलेली बघायला मिळाली. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील श्रुती शर्मा (Shruti Sharma) हीने देशात पहिला क्रमांक पटकावला, तर अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal) आणि गामिनी सिंगला (Gamini Singla) या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

Advertisement

दरम्यान, युपीएससीच्या निकाला संदर्भातील काही बातम्यांमध्ये मात्र पहिल्या चारही क्रमांकावर मुली असल्याचा दावा करण्यात आलाय. मुंबई तरुण भारतने ‘UPSC Result : पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी!’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केलीये. तर इंडिया पोर्टलच्या बातमीमध्ये देखील निकालांमध्ये पहिल्या चारही क्रमांकावर मुलीच असल्याचा उल्लेख बघायला मिळतोय.

4 UPSC toppers are girls TB news cutting
Source: Tarun Bharat

सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दावे केले जाताहेत. पहिल्या दहामध्ये सहा मुलींनी बाजी मारल्याचे सांगितले जातेय.

अर्काइव्ह

दरम्यान, चौथ्या क्रमांकावरील ऐश्वर्य वर्मा (Aishwarya Verma) हा मुलगा आहे. इंग्रजीतील स्पेलिंगमुळे ऐश्वर्य हे नाव ऐश्वर्या असे वाचल्याने अनेकांनी गल्लत झाली असण्याची शक्यता आहे. ऐश्वर्य वर्मा हा मध्य प्रदेशातील इंदौरचा आहे. मात्र तो सध्या कुटुंबियांसह उत्तर प्रदेशातील बरेली येथे वास्तव्यास आहे.

ऐश्वर्यने आपल्या चौथ्या प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलंय. पहिल्या प्रयत्नात तो प्रिलिम्स पास होऊ शकला नव्हता, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याला मुख्य परीक्षेने हुलकावणी दिली होती. चौथ्या प्रयत्नात मात्र त्याने देशात मुलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

युपीएससीच्या निकालानंतर इंग्रजीतील स्पेलिंगमुळे अनेकांची जी गल्लत झाली, ती ऐश्वर्यसाठी मात्र नवीन नाही. ऐश्वर्य इंडिया टूडेशी बोलताना सांगतो की माझ्या नावामुळे अनेकजण मला चिडवत असत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करे. पण नंतर विचार केला की मोठा होऊन एक दिवस टीव्हीवर येईन आणि लोकांना सांगेन की माझे नाव ऐश्वर्य आहे, ऐश्वर्या नाही.”

पहिल्या दहामध्ये सहा मुली?

युपीएससीच्या निकालांमधील पहिल्या दहा मधील सहा मुली असल्याचे दावे देखील चुकीचे आहेत. श्रुती, अंकिता आणि गामिनी या पहिल्या तिघींच्या नंतर इशिता राठी (Ishita Rathi) ही आठव्या क्रमांकावर आहे. या चौघींव्यतिरिक्त टॉप 10 यादीत इतर सहा मुलांचा समावेश आहे.

टॉप-10 लिस्ट

1- श्रुती शर्मा

2- अंकिता अग्रवाल

3- गामिनी सिंगला

4- ऐश्वर्य वर्मा

5- उत्कर्ष द्विवेदी

6- यक्ष चौधरी

7- सम्यक एस जैन

8- इशिता राठी

9- प्रितम कुमार

10- हरकीरत सिंह रंधावा

हेही वाचा- UPSC परीक्षेत ‘इस्लामिक स्टडीज’ विषय घेऊन IAS होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढलीये?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा