Press "Enter" to skip to content

मुस्लीम राष्ट्राच्या निर्मितीसाठी केरळातील मुस्लीम मुलींना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जातेय?

भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्यासाठी केरळी मुस्लीम आपल्या मुलींना शस्त्रे चालवायला शिकवत असल्याचे दावे करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement

‘केरल में मुसलमान अपनी बेटियों को शस्त्र चलाना सीखा रहे है और हिन्दू अपनी बेटियों को डांस सीखा रहे है मुसलमान लडकिया भारत को मुस्लिम राष्ट्र बनाने का सपना देख रहा है और हिन्दू लडकिया अमीर सलमान और शाहरुख को अपना बनाने का सपना सँजोये बैठी है’

अशा कॅप्शनसह २.२० मिनिटांचा एक व्हिडीओ कट्टर हिंदुस्थानी, RSS शिवाजी नगर नोईडा यांसारख्या फेसबुक ग्रुप्स, प्रोफाईल्सवर शेअर केला जातोय.

केरल में मुसलमान अपनी बेटियों को शस्त्र चलाना सीखा रहे है और हिन्दू अपनी बेटियों को डांस सीखा रहे है मुसलमान लडकिया भारत को मुस्लिम राष्ट्र बनाने का सपना देख रहा है और हिन्दू लडकिया अमीर सलमान और शाहरुख को अपना बनाने का सपना सँजोये बैठी हैअजून वेळ गेलेली नाही आहे हिंदूंनो वेळीच सावध होऊन आपल्या मुलांना डान्स आणि गाणे शिकवण्यापेक्षा स्वसंरक्षण आणि मर्दानी खेळ शिकवून तयार करा येणारा काळ खूप वाईट असेल त्याची चाहूल आताच ओळखा 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

Posted by कट्टर हिंदुस्थानी on Saturday, 12 June 2021

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी व्हॉट्सऍपवर देखील हेच दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ बारकाईने पाहिला असता त्यात ‘AsiaNet News’ चा वॉटरमार्क आढळला. हाच धागा पकडत गुगल सर्च केले असता युट्युबवर २७ जुलै २०१५ रोजी अपलोड करण्यात आलेल्या बातमीचा ६.३८ मिनिटाचा संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळाला.
  • बातमीची भाषा मल्याळम असल्याने आशय समजणे अशक्य होते परंतु व्हिडीओखाली असलेल्या ‘Hamzathali Gurukkal’s Grand daughter Arifa 21 years old girl teaching Marshal Arts in Edappal’ या माहितीच्या आधारे पुन्हा गुगल सर्च केले.
  • आम्हाला ‘द हिंदू’ची बातमी सापडली. बातमीनुसार २६ वर्षीय आरीफा केरळाचा पारंपारिक खेळप्रकार ‘कलारीपयट्टू’ शिकत आणि शिकवत आहे.
  • आरीफाचे वडील ‘कलारीपयट्टू’ तरबेज आहेत. त्यांनीच आरीफाला शिकवले. ती आजतागायत ४ वेळा ‘स्टेट चँपियन’पद जिंकली आहे.
  • केंद्रशासनाने ‘कलारीपयट्टू’ खेळास ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ मध्ये सामिल करून घेतले आहे.
  • हा खेळ कुठल्याही धर्माच्या किंवा लिंगाच्या सिमांपलीकडे आहे. प्रत्येक मुलीने- महिलांनी स्व-संरक्षणासाठी हा खेळ खेळायला हवा असे आरीफाचे मत आहे.
  • केवळ मुस्लीम मुळीच नव्हे तर हिंदू महिलांची देखील या खेळात वाखाणण्याजोगी कामगिरी आहे. NDTVच्या २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ७३ वर्षीय वयाच्या मीनाक्षी अम्मा ‘कलारीपयट्टू’ तरबेज आहेत. एखाद्या तरुणाला लाजवतील एवढी त्यांची सफाईदार खेळी आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे दिशाभूल करणारे आणि धार्मिक सौहार्द गढूळ करणारा असल्याचे निदर्शनास आले. मुस्लीम मुलगी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेऊन मुस्लीम राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पहात नसून ती हिंदू धर्माची पार्श्वभूमी असणारा पारंपारिक ‘कलारीपयट्टू’ खेळ खेळत आणि शिकवत आहे.

हेही वाचा: बंगालमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर फक्त मुस्लिमांचा भरणा? व्हायरल यादी दिशाभूल करणारी!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा