Press "Enter" to skip to content

‘कोव्हीड१९’ची लस घेतल्याने भारतीय सैनिक बेशुद्ध पडताहेत?

भारतीय सैनिकांचा (Indian Army) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओ मध्ये काही सैनिक जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहेत. त्यांच्यावर प्रथमोपचार चालल्याची गडबड दिसून येत आहे. दावा केला जातोय की ‘कोव्हीड१९’ची लस घेतल्यानंतर पळत असताना ते बेशुद्ध झाले. त्यातील काहींना हृदयविकाराचा झटका आला तर काहींनी जागीच प्राण सोडले.

Advertisement

‘देश के फौजियों ने वैक्सीन लगवाई ओर जब वो दौड़ रहे थे तो बहुत लोग बेहोश हो गए हैं
और कइयों को भयंकर बीमारी दिल का दौरा पड़ा और कही फोजियो ने दम तोड़ दिया
मीडिया पूरी तरह चुप बैठा है
पंजाब भारत…..
अब बताओ वैक्सीन सही है या गलत….’

या अशा कॅप्शनसह २१ सेकंदाचा व्हिडीओ फेसबुक, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांत व्हायरल होतोय.

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रशांत कारखानीस, निलेश मालानी आणि निसार अली यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या नंतर आम्हाला पत्रकार ‘मान अमन सिंह चिना’ यांचे ट्विट मिळाले. यामध्ये त्यांनी व्हायरल व्हिडीओ शेअर करत ‘९ कॉर्प्स रेकी ट्रूप’ या स्पर्धेच्या संदर्भाने भारतीय सैन्याकडून देण्यात आलेल्या निवेदनाविषयी लिहिलंय. त्यात ते म्हणतात,

पठाणकोट मध्ये झालेल्या सराव प्रात्यक्षिकादरम्यान खराब वातावरणामुळे एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर बाकीच्यांना पठाणकोट रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

पठाणकोटमध्ये झालेल्या या घटनेविषयी अधिक माहिती मिळवत असताना आम्हाला ‘इंडियन एक्स्प्रेस‘ची बातमी सापडली. या बातमीनुसार पठाणकोटजवळील मामून सैन्य स्थानकाजवळ ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ‘९ कॉर्प्स रेकी ट्रूप’ स्पर्धेचे (9 corps recce troop competition) आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धा हा सैन्य प्रशिक्षणाचाच एक भाग आहे. यावेळी उष्माघातामुळे ३४ सैनिकांची तब्येत अत्यवस्थ झाली. काही बेशुद्ध झाले. यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला असून ४ सैनिक गंभीर आहेत. त्यांच्यावर पठाणकोट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातमीत असाही उल्लेख आहे की सदर स्पर्धा ७२ तासांपासून सुरु होती. संपूर्ण हत्यारे, बंदुका असा वजनदार लवाजमा स्वतःवर लादून १० किलोमीटर चढाईचे ते प्रशिक्षण होते. त्यात वरून अतिशय उष्ण आणि दमट हवामानामुळे सैनिकांना त्रास झाला.

हीच माहिती असलेल्या बातम्या ‘इंडिया टीव्ही, एनडीटीव्ही, डेक्कन क्रॉनिकल या राष्ट्रीय माध्यमांनीही दिल्या आहेत. यातील एकही बातमीत लसीकरणाचा हा परिणाम असल्याचा कुठेही उल्लेख नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल व्हिडीओसह होत असलेले ‘कोव्हीड१९’ची लस घेतल्याने सैनिक बेशुद्ध पडल्याचे दावे फेक आणि निराधार असल्याचे स्पष्ट झाले. सैनिकांच्या बेशुद्ध होण्याचे कारण उष्माघात होता, लसीकरण नाही.

हेही वाचा: ‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा