Press "Enter" to skip to content

भारतीयांना इजा पोहचविण्यासाठी चीनकडून फटाक्यांचा वापर? गृह मंत्रालयाकडून देशवासियांना सतर्कतेच्या सूचना?

चीनने यावर्षी पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतीय नागरिकांमध्ये दमा पसरावा म्हणून, डोळ्यांना इजा पोहचावी म्हणून घातक रसायने टाकून फटाके बनवले आहेत. त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देणारा गृह मंत्रालयातील वरिष्ठ तपास अधिकारी विश्वजित मुखर्जी यांचा मेसेज सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.

Advertisement
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिल पाटील आणि कैलास ढवळे यांनी सदर व्हायरल मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेजची पडताळणी करण्यास सुरुवात केली असता असे लक्षात आले की हे मेसेजेस २०१७ सालापासून इंग्रजी भाषेत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

२०१९ साली अल्ट न्यूज, द क्विंट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील विविध फॅक्टचेक पोर्टल्सने गृह मंत्रालयाला संपर्क साधून विचारणा केली असता सदर मेसेज फेक असल्याचे समजले. ‘विश्वजित मुखर्जी’ नावाचे कुणी अधिकारी गृह मंत्रालयात कार्यरतच नाहीत, एवढेच नव्हे तर ‘वरिष्ठ तपास अधिकारी’ असे कुठले पद देखील अस्तित्वात नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल मेसेज फेक आहेत. परंतु फटक्यांच्या धुराने मानवी शरीरास विशेषतः लहान मुलांवर आणि वृद्धांवर विपरीत परिणाम होतात हे सर्वच जण जाणतात. त्यामुळे फटाके न फोडणे किंवा शक्य तितके कमी फोडणे हे कधीही आरोग्यासाठी व समाजासाठी चांगलेच ठरेल.

हेही वाचा: व्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा