Press "Enter" to skip to content

शेतकरी आंदोलक आता काश्मीर प्रश्नावरील ‘आर्टिकल ३७०’ पुन्हा लागू करा म्हणतायेत?

शेतकरी कायद्यांविरुद्ध ‘चलो दिल्ली’ आंदोलनासाठी जमलेले शेतकरी आता शेतीविषयक मागण्या सोडून इतर कथित ‘देश विरोधी’ मागण्याही करत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी आंदोलक आता ‘CAA आणि आर्टिकल ३७०’ विषयीसुद्धा आंदोलन करू लागलेत (farmers asking to restore article 370) असा दावा करणारे ग्राफिक्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement

शीख पगडी घातलेले लोक हातात एक फलक पकडून आहेत आणि त्यावर ‘Restore Aricle 370, 35A’ असे लिहिले आहे. या फोटोखालील ग्राफिक्सवर एका बाजूला ‘CAA पर अरेस्ट लोगोंको रिहा किया जाए’ आणि दुसरीकडे ‘आर्टिकल 370 और 35A फिर से लागू हो’ असे लिहून या त्य्यांच्या मागण्या असल्याचे दर्शवले जात आहे. आणि या सर्वावर ‘क्या ये भी किसान के खेत की समस्या है?’ असा सवाल केला गेलाय.

व्हायरल ग्राफिक्स:

Farmers protesting for CAA and 370 viral claim graphics
Source: Whatsapp

सदर ग्राफिक्स व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

भाजप समर्थक शेफाली वैद्य यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो ट्विट करून आंदोलक शेतकऱ्यांविषयी प्रश्नचिन्ह उभं केलंय. वैद्य यांनी पोस्ट केलेला फोटो २६०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.

अर्काइव्ह पोस्ट

भाजप महिला मोर्चाच्या सोशल मिडिया प्रमुख असलेल्या प्रीती गांधी यांनी सुद्धा हेच दावे करणारे ‘ExSecular’ या हँडलवरून केलेले ट्विट रीट्विट केले होते. या ट्विटला तब्बल २७०० पेक्षा अधिक लोकांनी रीट्विट केले आहे.

Priti gandhi retweeted farmer protesters demanding 370 restoration fake claim
Source: Twitter

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी ग्राफिक्ससोबत फिरणारा आंदोलकांचा फोटो रिव्हर्स सर्च इमेजद्वारे शोधून पाहिला.

‘शिरोमणी अकाली दल अमृतसर’च्या फेसबुकपेज वरून ८ ऑगस्ट २०१९ रोजी सदर फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने आर्टिकल ३७० हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हा देशभरातून विविध संघटनांनी विरोध दर्शवला होता. यापैकी ‘शिरोमणी अकाली दल’ या संघटनेने केलेल्या आंदोलनाचा हा फोटो आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये शेतकरी आंदोलक ‘आर्टिकल ३७० आणि ३५ अ’ पुन्हा लागू करण्याची मागणी करत (farmers asking to restore article 370) असल्याचे सांगण्यासाठी जो फोटो व्हायरल होतोय तो जवळपास दीड वर्षापूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले. हे शेतकरी आंदोलक नसून ‘शिरोमणी अकाली दल’चे कार्यकर्ते आहेत.

शेतकरी आंदोलनाला देशविरोधी ठरण्यासाठी केंद्र सरकार/ भाजप समर्थकांकडून अनेक प्रकारचे ‘फेक दावे’ केले जात आहेत. त्यापैकीच हा एक फेक दावा. इतर फेक दावे जाणून घेण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.

हेही वाचा: शाहिनबागच्या आंदोलनातील दादी पंजाबी शेतकरी बनल्याचा कंगना राणावतकडून फेक दावा

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा