तमिळनाडूच्या जंगलात ‘उधू पवई’ (oodhu paavai) नावाचे एक औषधी वनस्पती आढळते. ही तांबड्या रंगाची अनोखी वनस्पती वाफेच्या इंजिनाप्रमाणे ठराविक अंतराने धूर सोडताना दिसते. हा धूर नसून त्याचे परागकण पसरविण्याचा तो मार्ग आहे, अशा दाव्यासह एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.
‘भगवान की आश्चर्यचकित करने वाली रचना इस औषधीय पौधे को तमिल में #OODHU_PAAVAI कहा जाता है। स्वयं को विकसित रखने के लिए यह अपने परागकणों को समय समय पर अपनी किप जैसी संरचना के माध्यम से उड़ा देता है।’ अशा हिंदी कॅप्शनसह तो व्हिडीओ व्हायरल होतोय.
तर ‘This medicinal plant is called as OODHU PAAVAI in Tamil and found only in rainy dark forests. To keep itself developed, it blows out its pollen grains periodically through its funnel like structure. God’s creation leaves us wonder struck.Its breathing pattern is a marvel.’ अशा इंग्रजी कॅप्शनसह देखील तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. राहुल पाटील यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल कॅप्शनमधील काही शब्द कीवर्ड्स म्हनून वापरत गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की हे दावे आताच नव्हे, तर २०२१ सालापसून व्हायरल होतायेत. मानसोपचारतज्ज्ञ असणारे डॉ. रॉय कल्लीवयालील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २६ सप्टेंबर २०२१ रोजी हे दावे ट्विट केले होते.
त्यानंतरच देशभरात आणि विदेशात हे दावे व्हायरल होऊ लागले. इतके की नॉर्वे देशातील ग्रीन बेल्ट अँड रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष एरिक सोलेम यांनीही आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले होते.
‘चेकपोस्ट मराठी’ने या झुडपाच्या नावाने बरीच शोधाशोध केली परंतु अशी काही वनस्पती किंवा त्याविषयीची अधिकृत माहिती आम्हाला सापडली नाही. व्हिडीओ बारकाईने पाहिला असता खालील उजव्या कोपऱ्यात ‘LUKE_PENRY EXR’ असे लिहिल्याचे आढळून आले. या नावाने सर्च केले असता याच नावाच्या युट्युब चॅनलवर सदर व्हिडिओ २० सप्टेंबर २०२१ रोजी अपलोड केल्याचे दिसले.
या व्हिडीओखालील मजकुरात सदर व्हिडीओविषयी भारतात अनेक चुकीचे दावे केले जात असल्याचे सांगितले आहे. हे ल्युक पेन्री कोण हे शोधत असताना त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशाप्रकारचे विविध व्हिडीओज पहायला मिळाले. त्यांच्या बायोमध्ये ‘3D Motion Generalist’ असे लिहिले आहे.याचाच अर्थ हे आणि इतर सर्व व्हिडीओ त्यांनी संगणकाच्या मदतीने, थ्री डी अनिमेशन तंत्राने बनविलेले आहेत. हे काही खरे झाड नाही. सदर व्हायरल व्हिडीओला असलेला साउंड फ्लांक ऑडीओने तयार केलेला आहे. याविषयी ल्युक यांनी त्यांच्या इन्स्टा पोस्टमध्ये माहिती दिलीय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की तामिळनाडूमध्ये वाफेच्या इंजिनाप्रमाणे धूर सोडणारी ‘उधू पवई’ नामक वनस्पती असल्याचे दावे फेक आहेत. तसेच व्हायरल होत असलेला व्हिडीओ खरा नसून थ्रीडी अनिमेशन आहे.
हेही वाचा: योगविद्येच्या सहाय्याने तमिळनाडूतील तरुण आकाशात उडाल्याचे व्हायरल दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]