Press "Enter" to skip to content

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य!

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरविले जात आहे. बंडखोर आमदारांकडून राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाली असल्याचे दावे देखील केले जाताहेत.

Advertisement

सोशल मीडियावर याच संदर्भाने एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुठल्याशा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक होताना बघायला मिळतेय. बघता बघता या वादावादीचे रुपांतर हाणामारीत होते. सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले असल्याचा दावा हा व्हिडीओ शेअर करताना केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या डावीकडील बाजूच्या वरच्या कोपऱ्यात Airoli असे लिहिलेले बघायला मिळतेय. याच आधारे किवर्डच्या माध्यमातून शोध घेतला असता आम्हाला ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीच्या युट्यूब चॅनेलवरून 1 मार्च 2019 रोजी अपलोड करण्यात आलेली बातमी बघायला मिळाली.

बातमीनुसार ऐरोलीत महापालिकेच्या नवीन सभागृहाच्या उद्घाटनच्या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटनाचे श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसांत भिडले होते. या हाणामारीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर कारची तोडफोड केली होती.

संदीप नाईक यांच्यावरील शिवसेनेने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, दिघा, घणसोली बंद करण्यात आला होता.

महाविकास आघाडी बनण्याआधीचा व्हिडिओ:

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नोव्हेंबर 2019 मध्ये शपथ घेतली होती, तर हा व्हिडीओ मार्च 2019 मधील घटनेचा आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा व्हिडीओ जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडिओचा सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- एकनाथ शिंदे नशेत असल्याचे दर्शवणारा व्हिडीओ अर्धवट! जाणून घ्या सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा