Press "Enter" to skip to content

त्रिपुरामधील मुस्लिमविरोधी घोषणाबाजीचा जुना व्हिडीओ सध्याचा म्हणून व्हायरल!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावरून काही लोकांची एक फेरी जात असल्याचे बघायला मिळतेय. या दरम्यान चिथावणीखोर मुस्लिम विरोधी घोषणाबाजी देखील केली जात असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडीओ त्रिपुरामध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेचा असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओतील घोषणांच्या किवर्डच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला युट्युबवर 28 ऑक्टोबर 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. हा व्हिडीओ आणि सध्याचा व्हायरल व्हिडीओ यांमधील घोषणाबाजी आणि दृश्ये एकमेकांशी जुळणारी आहेत. यावरून व्हिडीओ सध्याचा नसून ऑक्टोबर 2021 मधला असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर किवर्डसच्या आधारे अधिक शोध घेतला असता आम्हाला न्यूजलॉन्ड्रीच्या वेबसाईटवर 13 नोव्हेंबर 202 रोजी या घटनेविषयी प्रसिद्ध सविस्तर रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टनुसार या रॅलीचे आणि मुस्लिम विरोधी घोषणाबाजीचे नेतृत्व राणू दास नावाचा नेता करत होते. राणू दास हे त्रिपुरामधील सत्ताधारी भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे स्थानिक सरचिटणीस आहेत. त्यापूर्वी दास हे विहिंपची युवा संघटना बजरंग दलाचे कार्यकर्ता होते.

या घटनेसंबंधीच्या ‘द वायर’च्या रिपोर्टनुसार 26 ऑक्टोबर 2021 रोजी त्रिपुरातील पाणीसागर येथे विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान मुस्लिमविरोधी आणि उन्मादी घोषणा देण्यात आल्या होत्या. या रॅलीदरम्यान मशिदीची तोडफोड तसेच अनेक घरे आणि दुकानांवर हल्ले करण्यात आले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ सध्याचा नसून तो ऑक्टोबर 2021 मधील घटनेचा आहे. सध्या त्रिपुरामधील रॅलीत मुस्लिम विरोधी घोषणाबाजीही कुठलीही घटना घडलेली नाही.

हेही वाचा- असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत समर्थकांकडून पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा