Press "Enter" to skip to content

खलिस्तान जिंदाबादचे नारे लावणारी बाईक रॅली पंतप्रधान मोदींवर चालून येत होती?

सोशल मीडियावर बाईक रॅलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये बाईक रॅलीतील लोक ‘खलिस्तान’चा झेंडा फडकावताहेत तसेच ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या 5 जानेवारी रोजीच्या पंजाब दौऱ्यादरम्यानचा आहे. यातून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होतेय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

नरेंद्र मोदी फॅन या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. याच ट्विटच्या रिप्लायमध्ये एका युजरकडून हा व्हिडीओ 26 डिसेंबर 2021 रोजी पंजाबमधील सरहिंद येथे छोटे साहिबजादे यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या बाइक रॅलीचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला यूट्यूबवर 27 डिसेंबर 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की व्हायरल व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 जानेवारी रोजीच्या पंजाब दौऱ्यादरम्यानचा नसून या दौऱ्याच्या साधारणतः आठवडाभरापूर्वीचा आहे.

गुरु गोविंद सिंगांच्या (Guru Gobind Singh) मुलांना छोटे साहिबजादे (Chote Shibzade) म्हंटले जाते. त्यांना 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या अवघ्या 6 आणि 9 व्या वर्षी हौतात्म्य प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. यालाच ‘सक सरहिंद’ (Saka sirhind) असेही म्हंटले जाते. पंजाबच्या फतेहगढ साहिब येथे दरवर्षी 26 डिसेंबर रोजी शहीदी जोर मेळा आयोजित करण्यात येतो. व्हायरल व्हिडीओ याच सभेतला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्याशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आठवडाभरापूर्वीपासूनच इंटरनेटवर उपलब्ध आहे.

हेही वाचा- कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लीम गटाने हल्ला केल्याचे दावे फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा