Press "Enter" to skip to content

दुर्गा वाहिनी कार्यकर्तीच्या नावे जातीय तेढ निर्माण करणारी जुनी फेक पोस्ट होतेय नव्याने व्हायरल!

‘पाच क्षुद्रांना मारल्यावर अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते’ असे लिहिलेली ‘दुर्गा वाहिनी’ कार्यकर्ती संजीवनी मिश्राची (sanjivani mishra durga vahini) पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Advertisement

विश्व हिंदू परिषदेचे महिला संघटन ‘दुर्गा वाहिनी’चे नाव असणारे वस्त्र ,हातात तलवार असणाऱ्या युवतीचा फोटो आणि जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.

व्हायरल स्क्रिनशॉट सोबतचा मजकूर:

‘आज के दिन शूद्रो को मारना बडा पुण्य का काम होत है ! यदि कोई वयक्ती 5 शूद्र को मारता है तो उसे एक अश्व मेघ यज्ञ के बराबर पुण्य मिलेगा ! जय परसुराम’

चेतन बैरवा यांनी २० ऑगस्ट रोजी फेसबुकवर हा स्क्रिनशॉट शेअर केला होता. या पोस्टला बातमी करेपर्यंत १४३ लोकांनी शेअर केले होते.

https://www.facebook.com/chetan.bairwa.56/posts/3310561135835112

अर्काईव पोस्ट

सदर स्क्रिनशॉट व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सचिन झगडे यांनी 9172011480 या आमच्या व्हाट्सऍप नंबरवर संपर्क साधून निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करताना आम्ही व्हायरल पोस्ट गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले. सोबतच काही कीवर्ड्स वापरून फेसबुक, ट्विटरवर देखील सर्च केले.

सदर पोस्ट दोन वर्षा पूर्वीची

व्हायरल पोस्ट दोन वर्षापूर्वीची आहे. १३ एप्रिल २०१८ रोजी ‘अन्तर्राष्ट्रीय ब्राह्मण महासंस्था-द्वारा ब्राह्मण जगत कल्याण संस्था(रजि.)’ या फेसबुक ग्रुपवर ह्रीदेश भारद्वाज यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी केरळचे वित्तमंत्री टी. थॉमस यांची एक पोस्ट शेअर करून काही मजकूर लिहिला होता.

भारद्वाज यांनी लिहिलेय.केरल के वित्त मंत्री थामस एसक ने अपने Facebook पोस्ट पर संजीवनी मिश्रा नाम की दुर्गा वाहिनी की कार्यकर्ता का फोटो शेयर किया है जिसमें वह दलितों को मारने की शपथ ले रही है यह पूरी तरह एक झूठा Facebook ID है जिसके माध्यम से हिंदुओं को आपस में लड़ाने का षड्यंत्र है सच्चाई रत्ती भर भी नहीं वामपंथी हिंदुओं को किस प्रकार लड़ा रहे हैं इसका यह जीता जागता प्रमाण हैआप लिंक पर जाकर देख सकते हैं वित्त मंत्री ने अपनी Facebook id पर इसे क्यों बढ़ावा दिया है अगर आप अभी नहीं समझे वामपंथियों का षड्यंत्र तो यकीन मानिए आप से बड़ा महामूर्ख कोई नहीं”

केरळचे वित्तमंत्री टी. थॉमस यांची पोस्ट

केरळचे वित्तमंत्री थॉमस यांनी ४ एप्रिल २०१८ रोजीच्या पोस्टमध्ये संजीवनी मिश्राच्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर करून काही मजकूर लिहिलाय. मल्याळम भाषेतील या मजकुरात थॉमस लिहितायेत

‘पाच शूद्रांचा खून करणे अश्वमेध यज्ञाच्या समतुल्य आहे असे लिहिणारी संजीवनी मिश्रा आरेसेसच्या दुर्गा वाहिनीची सदस्य आहे. त्यांच्यावर टीका झाल्यावर त्यांनी आता ती पोस्ट डिलीट केलीय पण हे किती विषारी मनोवृत्तीचे आहेत हे दिसतंय. लोकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या विरोधात कुठलाही कायदा कानून नाहीये.’

അഞ്ചു ശൂദ്രന്മാരെ കൊല്ലുന്നത് ഒരു അശ്വമേധയാഗത്തിനു തുല്യമായ പുണ്യകർമ്മമാണത്രേ. ദുർഗാ വാഹിനി എന്ന ആർഎസ്എസ് വനിതാ…

Posted by Dr.T.M Thomas Isaac on Wednesday, 4 April 2018

ते अकाऊंट फेक होते

फेसबुक सर्च मध्ये ‘भास्कर वास्तविक’ यांची पोस्ट आम्हाला सापडली. यामध्ये त्यांनी दोन स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. एक आहे व्हायरल पोस्टचा आणि दुसरा आहे फेसबुकच्या कारवाईचा. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ही पूर्ण पोस्ट मी कुणाची तरी कॉपी पेस्ट केली होती त्यामुळे त्यांच्या मजकुरावर फार लक्ष देण्यापेक्षा त्यात असणारा स्क्रिनशॉट काय सांगतोय हे बारकाईने अभ्यासले.

व्हायरल पोस्ट २ एप्रिल २०१८ रोजी पोस्ट केली होती. ३ एप्रिल रोजी कुणा फेसबुक युजरने ही पोस्ट रिपोर्ट केली. फेसबुकने ती रीव्ह्युव केली आणि संपूर्ण प्रोफाईलच फेसबुकवरून काढून टाकली. यात जर व्यवस्थित पाहिले तर लक्षात येईल की रिपोर्ट करणाऱ्याने पोस्ट नव्हे तर प्रोफाईल रिपोर्ट केली होती. ‘you anonymously reported Sanjiwani Mishra for pretending to be someone they’re not’ असे आपण पाहू शकतो. म्हणजेच संजीवनी मिश्रा (sanjivani mishra durga vahini) नावाने कुणीतरी फेक अकाऊंट काढून हे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.

facebook removed sanjiwani mishra checkpost marathi factcheck

वस्तुस्थिती:

आजच्या दिवशी ५ शूद्रांना मारून अश्वमेध यज्ञासमान पुण्य मिळत असल्याचा दावा करणारी दुर्गा वाहिनीची कार्यकर्ती संजीवनी मिश्राची फेसबुक पोस्ट आताची नसून २ एप्रिल २०१८ मधली असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले.

सोबतच हे सुद्धा समोर आले की सदर पोस्ट फेक अकाऊंटवरून टाकण्यात आली होती. फेसबुकने यावर कारवाई करून ती प्रोफाईलच काढून टाकली होती.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टाच्या लोगोतील ‘सत्यमेव जयते’ काढून ‘यतो धर्मस्ततो जयः’ असे ब्रीदवाक्य लिहून मनुस्मृती लागू करण्याचा डाव आहे का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा