Press "Enter" to skip to content

अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयाला फायदा मिळवून देण्यासाठी कोरोनाचं नाटक करताहेत ?

अमिताभ बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेताहेत. सोशल मिडीयावर मात्र त्यांच्या संदर्भात वेगळाच दावा व्हायरल होतोय.

Advertisement

*अमिताभ बच्चन धावला नानावटीच्या मदतीला* अशा शिर्षकाची एक पोस्ट सध्या व्हॉटसएप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

या पोस्टमध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत. जसे की    

  • अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची फारसी लक्षणे नसून (Asymptomatic) ते एकदम फाईन (Fine) आहेत*।
  • बिग बी (अमिताभ) ट्विट्स (tweets) करून आपल्या खास शब्दात हॉस्पिटलची (नानावटी) तारीफ करून आभार सुद्धा मानीत आहे*।
  • *आता मेख अशी की, ज्या रेडिअंट ग्रुप (Radiant Group) च्या मालकीचे नानावटी हॉस्पिटल आहे त्यात स्वतः अमिताभ बच्चन भागीदार असून सन्माननीय बोर्ड मेम्बर सुद्धा आहे*। 【 मालकानेच मालकाचे आभार मानणे❓😇 】
Credit-Facebook
Credit-Facebook

पडताळणी :

‘चेकपोस्ट मराठी’ने सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांची पडताळणी केली.

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांच्यात कोरोनाची लक्षणं असण्या-नसण्याचा मुद्दाच गैरलागू आहे.

अमिताभ ट्विटरवरून ‘खास शब्दात हॉस्पिटलची (नानावटी) तारीफ करून आभार मानत असल्याचा’ दावा तपासण्यासाठी आम्ही अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटर हँडलला भेट दिली.

Credit- Twitter

दि. ११ जुलै रोजी आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बातमी अमिताभ यांनी  आपल्या ट्वीटर हँडलवरूनच दिली होती. ११ तारखेच्या त्या ट्वीटनंतर अमिताभ यांनी ३ ट्वीट केले आहेत. त्या प्रत्येक ट्वीटमध्ये ते आपल्या आणि कुटुंबियांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या हितचिंतकांना धन्यवाद देताहेत.

अमिताभ यांच्या एकाही ट्वीटमध्ये नानावटी हॉस्पिटलचा उल्लेख नाही.

‘नानावटी हॉस्पिटल ज्या रेडिअंट ग्रुपच्या मालकीचे आहे त्यात अमिताभ बच्चन बोर्ड मेम्बर आहेत का’ हे तपासण्यासाठी आम्ही रेडिअंट ग्रुपच्या वेबसाईटला भेट दिली.  

वेबसाईटवर आम्हाला रेडिअंट ग्रुपच्या संचालक मंडळाबद्दल माहिती मिळाली. या माहितीनुसार सध्या ग्रुपच्या संचालक मंडळावर अभय सोई, महेंद्र लोढा, प्रशांत कुमार आणि नारायण शेषाद्री हे आहेत.

अमिताभ बच्चन रेडिअंट ग्रुपच्या संचालक मंडळावर असल्याचा कुठलाही पुरावा आम्हाला सापडला नाही.

रेडिअंट ग्रुपकडून देखील यासंदर्भात स्टेटमेंट देण्यात आलंय. अमिताभ बच्चन रेडिअंट ग्रुपच्या संचालक मंडळावर असल्याच्या दाव्यांचा स्पष्टपणे इन्कार करण्यात आला आहे.

वस्तुस्थिती :

अमिताभ बच्चन आणि नानावटी रुग्णालय यांच्यामधील आर्थिक हितसंबंधाचे जे काही दावे सोशल मिडीयावर करण्यात येताहेत त्यांना कुठलाही आधार नाही.

कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय करण्यात आलेले हे दावे फेक असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा- अमिताभ यांचा नानावटीमधील डॉक्टरांना धन्यवाद देतानाचा व्हायरल व्हिडीओ अडीच महिन्यांपूर्वीचा !

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा