Press "Enter" to skip to content

पाकिस्तानी तालिबानने भारताला धमकी दिल्याच्या दाव्यासाठी शेअर केला जातोय अडीच वर्षांपूर्वीचा व्हिडीओ!

सोशल मीडियावर एका सशस्त्र व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमधील व्यक्ती भारत सरकारला धमकावत असल्याचे बघायला मिळतेय. सकाळच्या नमाजपूर्वी आम्ही दिल्लीवर पाकिस्तानचा झेंडा फडकावू, असं ही व्यक्ती म्हणतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्याच्या अफगाणिस्थानातील परिस्थितीच्या संदर्भाने शेअर केला जातोय. दावा केला जातोय की अफगाणिस्थानात सत्ता हाती घेतल्यानंतर आता तालिबानने भारताला धमकी दिली (taliban threatening india) आहे.

Advertisement

पाकिस्तानी कॅनेडियन लेखक तारेक फतह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानी तालिबानकडून भारताला धोका असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. फतह यांचं हे ट्विट २७०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह

भाजप नेते रविंदर गुप्ता यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • किवर्डच्या मदतीने गुगलवर शोध घेतला असता आम्हाला ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवरून सप्टेंबर २०१९ मध्ये शेअर करण्यात आलेला एक व्हिडीओ रिपोर्ट मिळाला.
Source: Facebook
  • काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटविण्यात आल्यानंतर पाकिस्तानमधून कशाप्रकारच्या प्रतिक्रिया आल्या, हे दर्शविणाऱ्या रिपोर्टमध्ये या व्हिडिओचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
  • ‘आज तक’च्या रिपोर्टमधून व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती नेमकी कोण आहे, याची माहिती मिळत नसली तरी व्हिडीओ जवळपास दोन वर्षांपूर्वीचा आहे, हे मात्र स्पष्ट होते.
  • व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती नेमकी कोण हे शोधण्यासाठी आम्ही आमचा शोध सुरूच ठेवला.आम्हाला ‘इंडिया टुडे’च्या वेबसाईटवर एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार व्हिडिओतील व्यक्ती पाकिस्तानी राजकीय नेता सैद काबेर आफ्रिदी आहे.
  • सैद काबेर या नावासह फेसबुकवर शोध घेतला असता संबंधित व्यक्तीचे फेसबुक पेज मिळाले. याच फेसबुक पेजवरून २२ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळले.
Source: Facebook

फेसबुक पेजवरील इतर फोटोची आणि आणि व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीची तुलना केली असता व्हिडिओतील व्यक्ती सैद काबेरच असल्याचे देखील स्पष्ट झाले.

said kaber photo compared with viral video person

सैद काबेर आफ्रिदी पाकिस्तानच्या ‘जमीयत उलेमा-ए-इस्लाम’ या संघटनेचा सरचिटणीस आहे. या संघटनेने तालिबानच्या अफगाणिस्थानवरील कब्जाचे समर्थन केले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानी तालिबानने भारत सरकारला धमकी दिल्याचा (taliban threatening india) दावा करण्यासाठी शेअर केला जात  असलेला व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास अडीच वर्षांपूर्वीचा आहे. सदर व्हिडिओचा सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- मराठ्यांना आणि रा.स्व.संघाला तालिबानी घाबरून असल्याचे सांगत व्हायरल होतोय पाकिस्तानचा व्हिडीओ!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा