Press "Enter" to skip to content

राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !

गांधी घराण्याचा वारसदार, काँग्रेस पक्षाचा माजी अध्यक्ष, राष्ट्रीय नेता असणाऱ्या राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी ट्रोलभैरव आणि विरोधक कसून मेहनत घेत असतात.

राहुल गांधींना अनेक वेळा ‘फेक न्यूज’ आणि फेक गोष्टींच्या आधारे टार्गेट केलं जातं. अशाच आजवर वापरल्या गेलेल्या ‘फेक न्यूज’चा, एडीट केलेल्या फोटोज-व्हिडीओजचा, खोट्या दाव्यांचा हा लेखाजोखा.

  • दावा: राहुल गांधी चीन धार्जिणे

भारत-चीन सीमेवर वाढत्या तणावात काही भारतीय जवान शहीद झाले. याबद्दल प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटला एका चीनी पत्रकाराने रीट्विट करून राहुल गांधींचे आभार मानले आणि ‘जोवर तुम्ही आहात तोवर आम्हाला काळजीचं कारण नाही.’ असं लिहिलं.

त्यानंतर लगेच राहुल चीनी लोकांच्या बाजूने आहेत असा प्रचार करत हे ट्विट हजारो लोकांनी शेअर केलं.

वस्तुस्थिती:

पडताळणी केल्यावर लक्षात आलं की हे चीनी व्यक्तीचं नाव असलेलं ट्विटर अकाऊंट जून २०२० म्हणजे याच महिन्यातलं आहे.

Advertisement
fake chinese reporter's twitter profile
Source: Twitter

त्याने ज्या ग्लोबल टाईम्स या चीनी न्यूजपेपरचा कर्मचारी असल्याचं लिहिलंय, त्यातील एकही व्यक्ती याच्या अकाऊंटला फॉलो करत नाहीये. किंबहुना चीनी लोक याचे फॉलोअर्स नसून भारतीय लोकच त्याला फॉलो करत आहेत. या सर्व बाबी हे ट्विटर हँडल कुणा भारतीय व्यक्तीचं असल्याकडेच बोट दाखवणाऱ्या आहेत.

  • दावा: आलू डालो सोना निकलेगा

राहुल गांधी यांचा ‘इस साईड से आलू डालो, उस साईड से सोना निकलेगा’ असं वक्तव्य असणारा व्हिडीओ खूप जोरदार व्हायरल झाला होता.

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी सुद्धा यावर ट्विट केलं होतं.

वस्तुस्थिती:

‘इस साईड से आलू डालो, उस साईड से सोना निकलेगा’ असं वक्तव्य केलेला व्हिडीओ अर्धवट कट केलेला आहे. मूळ व्हिडीओत पुढे एक वाक्य आहे. ‘मेरे शब्द नही नरेंद्र मोदीजी के शब्द है’.

कट केलेला व्हायरल व्हिडीओ आणि त्याचा मूळ व्हिडीओ दोन्हीला एकत्र घेऊन ABP न्यूजने पडताळणी करणारी बातमी केली होती. ती बातमी युट्युबवर उपलब्ध आहे.

ABP News fact check about Aalu sona factory
Credit: ABP News Youtube
  • दावा: महिलांवर बलात्कार करण्याचा सल्ला

‘राहुल यांनी महिलांवर बलात्कार करा असा सल्ला दिल्या’चा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केला होता.

वस्तुस्थिती:

झारखंडच्या प्रचारसभेत बोलताना देशाची परिस्थिती काय करून ठेवलीय. उत्तरप्रदेशात भाजप आमदाराने बलात्कार केलाय. देशभरात सर्वत्र अशाच बातम्या येतायेत. असं म्हणत ‘मेक इन इंडिया’ ऐवजी जणू ‘रेप इन इंडिया’ अशी मोहीम चालली असल्याचं म्हटलं होतं.

ANI च्या ट्विटमधील व्हिडीओ आपण पाहू शकता.

  • दावा: दारू पिऊन प्रचार
https://www.facebook.com/photo.php?fbid=1141821262677396&set=a.505891376270391&type=3&theater

२०१९ लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान प्रचार दौऱ्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल झाला. हातात बिअरचे कॅन असून ते दारू पिऊन प्रचार करण्यासाठी निघाले आहेत असं सांगण्यात आलं.

वस्तुस्थिती:

‘रिव्हर्स इमेज सर्च’मध्ये चांगल्या क्वालिटीचा जो फोटो मिळाला, तो आम्ही झूम करून पाहिला तेव्हा लक्षात आलं की ते कॅन बिअरचं नसून कोकाकोला या कोल्डड्रिंकचं आहे.

Clear pic of RG having some drink
drink is not a beer its a coca cola can
  • दावा: अविवाहित असल्याचं सांगून देशाला फसवलं

‘राहुल गांधी यांचं लग्न झालेलं असून त्यांना २ मुलं आहेत. ते लंडन मध्ये राहतात. त्यांची पत्नी कोलंबियन आहे. पहिलं मुल १४ वर्षांचा मुलगा नियाक आणि दुसरी मुलगी माईनक १० वर्षांची  आहे. स्वतःला अविवाहित म्हणून राहुल गांधी देशाला फसवत आहेत.’

या अशा दाव्यांसह एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात त्यातील स्त्री राहुल गांधी यांची बायको असल्याचं सांगितलं जात होतं.

viral post claiming RG is married pic with wife
Spurce: Twitter

वस्तुस्थिती:

व्हायरल दाव्यात असलेल्या फोटोमधील स्त्री राहुल गांधी यांची पत्नी नसून त्यांचं नाव ‘नथालीया रामोस’ आहे. हा फोटो त्यांनी स्वतःच आपल्या ट्विटर, फेसबुकवर १४ आणि इंस्टाग्रामवर सप्टेंबर २०१७ रोजी शेअर केला होता.

Nathalia ramos posted pic with RG on insta
Source: Instagram

बर्ग्रुएन इन्स्टिट्यूट, लॉस एंजेलिसमध्ये मिलिंद देवरा, सॅम पित्रोदा आणि राहुल गांधी यांना बोलावण्यात आलं होतं. त्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सुद्धा उपलब्ध आहे. मुलाखतीनंतर तिथे उपस्थित असणाऱ्या नथालिया यांनी राहुल यांच्यासोबत फोटो काढला होता.

नथालीया रामोस या अमेरिकेतील अभिनेत्री असून त्यांचा जन्म स्पेनमध्ये झालाय. कंबोडियाशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.

  • दावा: लग्न जमलं, पप्पू पास हो गया!

‘आणि शेवटी राहुल गांधी यांच्याबाबतची आनंदी बातमी आलीच. आज सोनिया गांधी रायबरेलीला अखिलेश सिंह यांच्या घरी गेल्या. भेटून त्यांनी त्यांची मुलगी आदिती सिंहला राहुल गांधी यांच्याशी लग्नासाठी मागणी घातली. पप्पू पास हो गया..’

अशा पद्धतीचा मजकूर आणि कुटुंबीयांसोबतचे फोटोज व्हायरल झाले होते.

tweet SS claiming RG going to marry with Aditi Singh
Source: Twitter

 वस्तुस्थिती:

नेटकर्यांनी पुन्हा एकदा परस्परच राहुल गांधी यांचं लग्न लाऊन दिल्याचंच स्पष्ट झालं. कारण स्वतः आदिती सिंह यांनी या सर्व चर्चांना उत्तर म्हणून ट्विट केलं. काय  म्हणाल्या त्यात?

‘मागच्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयामध्ये अफवा पसरवली जात आहे त्यामुळे मी त्रासले आहे. राहुलजी आमचे केवळ पक्षाध्यक्षच नाहीत तर ते मला मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांचा खूप जास्त आदर करते. सर्वाना माझी विनंती आहे की कृपया लग्नासंबंधीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.’

Aditi Singh clarifies wedding with RG viral claim is fake
Source: Twitter
  • दावा: तिरंग्याला डाव्या हाताने सलामी

‘राहुल गांधी यांनी तिरंग्याला डाव्या हाताने सलामी दिली म्हणणारे अनेक दावे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. सोबत डाव्या हाताने सलामी देतानाचा फोटो सुद्धा जोडला गेला होता.

post claiming RG salutes flag with left hand
Source: Google image

वस्तुस्थिती:

दाव्यात दाखवलेला फोटो एडीट केलेला आहे. डावी बाजू उजवीकडे इन्व्हर्ट केलेली आहे.

याची खातरजमा करण्यासाठी आपण NDTVच्या बातमीतील त्या कार्यक्रमाचे फुटेज पाहू शकतो.

यात राहुल यांच्या उजव्या बाजूला उभा असलेला छत्री पकडलेला इसम दिसेल. तोच व्यक्ती दाव्यातील फोटोत डावीकडे कसा जाईल आपोआप? ती तर विरोधकांच्या एडीटींगची कमाल आहे.

NDTV video screenshot to show real position of RG and umbrella man
Source: NDTV
  • दावा: ऑफिसमध्ये औरंगजेबाचा फोटो

राहुल गांधी आपल्या ऑफिसमध्ये औरंगजेबाचा फोटो लावतात. असा आरोप करत एक फोटो शेअर केला गेला होता आणि सोबत उपरोधाने ‘इन देशभक्तों ने यह कौन से देश भक्त की तस्वीर लगा रखी’ असं लिहिलं होतं.

इन देशभक्तों ने यह कौन से देश भक्त की तस्वीर लगा रखी है

Posted by हिंदुत्व को बचाना है रामराज फिर लाना है 24 on Wednesday, 27 June 2018

वस्तुस्थिती:

शेअर केलेला फोटो एडीट केलेला असून खऱ्या तसबिरीत महात्मा गांधी आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका बातमीत शेअर केलेला हा खरा फोटो त्याचा पुरावा आहे.

Real image of Rahul Gandhi's office showing picture of Mahatma Gandhi
Source: The Indian Express
  • दावा: अश्लील गोष्टी पाहताना सापडले

राहुल गांधी मोबाईलमध्ये काही अश्लील फोटो पहात असल्याची इमेज व्हायरल केली गेली होती. सोबत सर्वांनी ‘फ़ोटो कभी झूट नहीं बोलती… देख लो राहुल गांधी क्या कर रहा है।‘ हे असं कॅप्शन ठेवलं होतं.

फ़ोटो कभी झूट नहीं बोलती… देख लो राहुल गांधी क्या कर रहा है।

Posted by Yogi Sarkar on Monday, 30 July 2018

वस्तुस्थिती:

व्हायरल इमेज एडीट केलेली असून. मूळ फोटोमध्ये राहुल गांधी यांच्या हातात मोबाईल नसून पैसे आहेत.

Embed from Getty Images
  • दावा: बनावट स्थलांतरीत मजुरांसोबत संवाद

राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या तसं विरोधक सज्ज झाले नवी कुरापात घेऊन. ज्या महिलेशी संवाद साधला जात आहे तीच महिला कारमध्ये बसलेला दुसरा एक फोटो सोबत जोडून पोस्ट्स व्हायरल झाल्या.

‘असे कोण मजूर आहेत जे इनोव्हा कार मध्ये फिरतात?’ अशी शंका उपस्थित करून राहुल गांधी यांनी नकली स्थलांतरीत लोकांशी संवाद साधल्याचे दावे पसरवले गेले.

Post claiming labours with RG are fake
Source: Twitter Archive

वस्तुस्थिती:

ANI या न्यूज एजन्सीच्या बातमीनुसार ‘हरियाणा वरून झांसीला चाललेल्या मजुरांना राहुल गांधी रस्त्यात भेटले. त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मजुरांना जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली.’

बातमीत जोडलेल्या दुसऱ्या फोटोत स्कार्फ गुंडाळलेली महिला गाडीत बसलेली आपण पाहू शकतो.

 याचाच अर्थ राहुल यांनी ज्यांच्याशी संवाद साधला त्यांना जाण्यासाठी व्यवस्था सुद्धा केली. ती महिला आणि इतर लोक कुणी अभिनेते नसून खरेखुरे स्थलांतरीत मजूरच आहेत.

हेही वाचा: सुशांतसिंह राजपूतला श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी त्यास क्रिकेटर म्हणाले का?

More from राजकारणMore posts in राजकारण »

8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा