Press "Enter" to skip to content

आदित्य ठाकरे यांचे जुने पोस्टर्स चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं एक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. पोस्टरवर पांढऱ्या कुर्तीमधील आदित्य ठाकरे आणि हिरव्या रंगाच्या बॅकग्राऊंवर उर्दूमधून काहीतरी मजकूर लिहिलेला असल्याचं बघायला मिळतंय.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘ज्वलंत हिंदुत्व’ अशा कॅप्शनसह हा फोटो ट्विट केलाय. भातखळकरांचं हे ट्विट अनेकांकडून रिट्विट देखील करण्यात आलंय.

Advertisement

अर्काइव्ह

शेफाली वैद्य यांनी देखील “हिंदूहृदय सम्राटांचे लाडके नातू आणि मराठी अस्मिता वगैरे….” अशा कॅप्शनसह उर्दू आणि गुजरातीमधील पोस्टरचे दोन वेगवेगळे फोटोज पोस्ट केलेत. गुजरातीमधील पोस्टरवर ‘केम छो वरळी’ असं लिहिलेलं असल्याचं लक्षात येतंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल पोस्टर नेमके कधीचे आहेत हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवरून २ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आलेलं ट्विट बघायला मिळालं. ANI च्या ट्विटमध्ये सध्या व्हायरल होत असलेलं उर्दूमधील पोस्टर बघायला मिळतंय.

शिवसेनेकडून मुंबईत वेगवेगळ्या भाषांमध्ये पोस्टर्स लावले आहेत. आदित्य ठाकरे वरळीमधून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, अशी माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली होती

या माहितीच्या आधारे शोध घेतला असता ‘दै. प्रभात’च्या वेबसाईटवर २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार शिवसेनेने आधी ‘केम छे वरळी’ असे पोस्टर लावले होते. या पोस्टर्सवरून शिवसेनेवर टिका झाल्यानंतर मराठी, बंगाली, उर्दू आदी. वेगवेगळ्या भाषांमध्ये पोस्टर्स लावण्यात आले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की आदित्य ठाकरे यांचे व्हायरल पोस्टर सध्याचे नसून २०१९ विधानसभा निवडणूकीच्या काळातले आहेत. त्यावेळी शिवसेनेकडून मराठी, उर्दू, गुजराथी आदी. सहा भाषांमधून ‘नमस्ते वरळी’ अशा अर्थाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. सोशल मीडियावर या जुन्या पोस्टर्सच्या माध्यमातून चुकीच्या दाव्यांसह दिशाभूल केली जात आहे.

हेही वाचा- राहुल गांधींची ‘बनावट समाजसेवा’ उघडकीस आणणारे व्हिडीओज झाले लीक? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘च्चेयाकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा