Press "Enter" to skip to content

‘लंकेश’ अभी जिंदा है! मृत्यूचा दावा म्हणजे निव्वळ अफवा !

रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ मालिकेत ‘लंकेश’ अर्थात रावणाची भूमिका जिवंत करणारे प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची बातमी सोशल मिडियावर व्हायरल होतेय.

‘गुजरात एकस्लुझीव’ या गुजराती भाषेतील न्यूज पोर्टलवर ३ मे रोजी या संदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. चित्रपट अभिनेते आणि गुजराती कलाकार अरविंद त्रिवेदी याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं असल्याचं, या बातमीत सांगण्यात आलं होतं.

‘दूरदर्शन चॅनल पर सिरीयल रामायण में रावण की भूमिका को निभाकर दमदार प्रदर्शन किया, ऐसे श्री अरविंद त्रिवेदी आज अपने परधाम यानी स्वर्गलोक को चले गये. विनम्र श्रद्धांजली’ या कॅप्शन सोबत फोटोज जोडून ‘मध्य प्रदेश न्यूज’ नावाच्या वेब पोर्टलवरून देखील ही बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी सोशल मिडीयावर अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूसंबंधीच्या पोस्ट टाकल्या. त्यांच्या आत्म्याला  शांती मिळावी, यासाठी प्रार्थना केल्या. त्यांना श्रद्धांजली वाहिल्या.

पडताळणी

बातमीची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही अरविंद त्रिवेदी यांच्या नावाने गुगलवर माहिती शोधली. त्यांच्या मृत्यू संदर्भात कुठे काही सापडतंय का याचा शोध घेतला. परंतु कुठल्याही मोठ्या पेपरने किंवा न्यूज चॅनल त्यांच्या मृत्युची बातमी प्रकाशित केल्याचे आम्हाला आढळले नाही.

इथेच जरा शंका आली की देशभरात एवढ्या गाजलेल्या रामायण मालिकेतील मुख्य पात्र ‘रावण’ साकारणारा अभिनेता गेल्यावर नक्कीच मोठी बातमी होईल. त्यात भर म्हणजे लॉकडाऊन मध्ये रामायण पुन्हा चालू झाल्याने अरविंद त्रिवेदींच्या मृत्युची बातमी नक्की च मोठी झाली असती.

याच संदर्भात ट्विटरवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता मात्र आम्हाला अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी याचं एक ट्वीट मिळालं. अरविंद त्रिवेदी यांच्या फोटोसह टाकण्यात आलेल्या या ट्वीटमध्ये कौस्तुभ यांनी आपले काका ‘लंकेश’ अरविंद त्रिवेदी अतिशय सुरक्षित असल्याचं सांगितलं. शिवाय त्यांच्या मृत्यू संदर्भात खोट्या बातम्या न पसरवण्याची विनंती देखील केली आहे.

वस्तुस्थिती

कौस्तुभ त्रिवेदी यांच्या ट्वीटनंतर अरविंद हे सुरक्षित आणि हयात असल्याचं, वेगळेपणाने सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील दावे म्हणजे निव्वळ अफवा ठरतात. त्यामुळे ते फॉरवर्ड न करता ‘चेकपोस्ट’वर अडवण्यातच शहाणपण !

हे ही वाचा- ‘पिठाच्या पिशव्यांमध्ये १५००० रुपये वाटणारा दानशूर व्यक्ती आमीर खान नाही’

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा