Press "Enter" to skip to content

गुजरात दंगलीत ३ मुस्लिम व्यक्तींना जाळून मारलेल्या आरोपीस लंडनमध्ये अटक झाली आहे का?

‘गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात (gujarat riots) ३ मुस्लिम व्यक्तींना मेहसाना येथे जाळून मारणाऱ्या आरोपीस सरतेशेवटी लंडनमध्ये अटक करण्यात आलीय’ अशा दाव्यांसह सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

अर्काइव्ह लिंक

व्हॉट्सऍपवरही अगदी असेच दावे असणारा मेसेज आणि एक ‘जसबीर सिंह रोडे’ नावाच्या व्यक्तीस NIA म्हणजेच ‘राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण’ या संस्थेकडून चौकशीसाठी पाठवण्यात आलेली नोटीस सुद्धा व्हायरल होते आहे.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निसार अली यांनी याविषयी माहिती देत पडताळणीची विनंती केली.

Source: WhatsApp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी व्हायरल दाव्यात वापरलेल्या शब्दांना कीवर्ड्स म्हणून सर्च केले. तेव्हा आम्हाला २०१६ सालची बातमी वाचायला मिळाली.

द क्विंट‘ने १७ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार गुजरात दंग्यांचा (gujarat riots) आरोपी समीर पटेल यास पश्चिम लंडन भागातील स्कॉटलंड यार्ड येथून अटक करण्यात आली होती.

या बातमीतील व्यक्ती आणि व्हायरल दाव्यातील व्यक्ती एकच आहे का याची खातरजमा करण्यासाठी व्हायरल व्हिडीओ आम्ही व्यवस्थित ऐकला तेव्हा व्हिडीओतील पोलीस ऑफिसर स्वतः त्या आरोपीचे नाव ‘समीर विनुभाई पटेल’ असल्याचे सांगत आहेत.

मग व्हॉट्सऍपवर NIA ची नोटीस पाठवलेले ‘जसबीर सिंह रोडे’ कोण आहेत हे शोधण्यासाठी आम्ही शोधाशोध केली. त्यामध्ये ‘द ट्रिब्युन‘ची १७ जानेवारी २०२१ची बातमी आम्हाला सापडली.

बातमीनुसार जसबीर सिंह हे ‘सिख फॉर जस्टीस’ या संघटनेशी संबंधित आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार ही संघटना खलिस्तान समर्थक असून भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी जसबीर सिंह यांना बोलावण्यात आले होते.

जसबीर सिंह यांनी ‘द ट्रिब्युन’शी बोलताना हे सर्व आरोप फेटाळून लावले असून ‘शेतकरी मोर्च्याला’ तोडण्यासाठी अशा पद्धतीने बदनाम करत सरकारी संस्था शेतकऱ्याना त्रास देत आहेत असे आरोप त्यांनी केले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावा अर्धसत्य असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच गुजरात दंगलीत मुस्लीम व्यक्तींची हत्या करणारा आरोपी ‘समीर पटेल’ यास लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे हे खरेय पण ती घटना तब्बल ५ वर्षे जुनी आहे. तसेच व्हॉट्सऍपवर NIAची नोटीस ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्यांचा गुजरात दंगलीशी काहीएक संबंध नाही.

हेही वाचा: कन्हैया कुमारने इस्लामचा स्वीकार केलाय का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा