Press "Enter" to skip to content

‘पिठाच्या पिशव्यांमध्ये १५००० रुपये वाटणारा दानशूर व्यक्ती आमीर खान नाही’

सोशल मिडीयाला आमीर खान याच्या रुपात ‘रॉबीनहूड’ सापडला आहे !

Advertisement

“एक माणुस …रात्री अकरा वाजता एक ट्रक पाठवतो. त्या ट्रकमध्ये लहान लहान 2 किलोचे आटा पॉकेट होते. मुंबईमध्ये काही लोक झोपडपट्टी गरीब भागात फिरून लोकाना बोलवत होते, या ज्याला गरज आहे त्यानी 2 किलो आटा घेऊन जा ज्याना गरज होती त्यानी नेले.

घरी जावून ते आटा उघडतात तर त्यात 15000.. हजार रुपये निघतात.दान करावे तर असे, रात्रीची वेळ ज्याला खरच गरज होती तो आला 15000… हजार रुपये घेऊन गेला. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ते आट्यासाठी आले. हेच आव्हान पैशासाठी असते तर गरजवंत दिसला नसता तर पैशाचा लोभी दिसला असता. अमीर खानच्या या दातृत्वाने खरा भुकेला शोधला गेला.

हा तोच अमीर खान…….अमीर तुझ्या कार्याला सलाम…… !”

हा असा मेसेज देशातील विविध भाषांमध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फिरत आहे.

Aamir khan distributed 15k in flour bags fb story
credit: facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट’ने जेव्हा या दाव्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमीर खान या बद्दल कुठे काही बोलला आहे का हे तपासून पाहिले. या क्रॉसचेकच्य वेळी आम्हाला अमीर खानने स्वतः त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून दिलेले स्पष्टीकरण सापडले. यात अमीर म्हणतोय,

‘मित्रांनो, पिठाच्या पिशव्यांमध्ये पैसे ठेवणारा व्यक्ती मी नाही. एक तर ही व्हायरल होत असणारी ही गोष्ट पूर्णपणे खोटी असावी किंवा हे दान करणारा जो कुणी ‘रॉबिन हूड’ असेल त्याला आपली ओळख सार्वजनिक करायची नसेल. काळजी घ्या, सर्वाना प्रेम.’

या व्यतिरिक्त आमच्या पडताळणीत ‘संदेश’ नावाच्या गुजराती वेबपोर्टलवर या संदर्भात एक   बातमी सापडली. गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने ती बातमी गुजरातीमधून इंग्रजीत भाषांतरीत केली असता असं समजलं की ही घटना सुरतमध्ये घडली आहे. ज्या कुणा व्यापाऱ्याने हे दान केलंय त्याला स्वतःचं नाव समोर येऊ द्यायचं नाहीये, त्याला ते गुप्तदान म्हणूनच ठेवायचं आहे. अर्थात या बातमीमध्ये करण्यात आलेला दावा अचूक मानता यावा, इतका ठोस पुरावा  बातमीमध्ये सापडत नाहीत. या लिंकवर क्लिक करून आपण थेट त्या बातमीवर जाऊ शकता.

वस्तुस्थिती:

व्हायरल स्टोरीमध्ये घडलेली घटना कुठे झाली, केव्हा झाली, त्या मागचा दानशूर व्यक्ती कोण आहे? किंवा असं काही खरंच घडलं होतं की ही रंजक गोष्ट अशीच कुणी व्हायरल केलीय याबद्दल काही ठोस पुरावे हाती आले नाहीत. त्यामुळे त्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही. परंतु आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालेले आहे की व्हायरल मेसेजमध्ये दावा केलेल्या गोष्टीचा आणि आमीर खान काहीही संबंध नाही. स्वतः अमीर खाननेच ही गोष्ट नाकारली आहे. त्यामुळे या व्हायरल पोस्टला आम्ही ‘चेकपोस्ट’वर अडवून ठेवत आहोत.

हे ही वाचा- इंस्टाग्राम वर मुलींचे न्यूड फोटोज टाकून गँग रेप करणाऱ्या मुलांची एक्स्पोज लिस्ट फेक!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा