Press "Enter" to skip to content

लखनऊमधील कोविड सेंटरचा म्हणून ‘आज तक’ने वापरला दिल्ली सरकारच्या शाळेचा फोटो !

कोरोनामुळे उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये हाहाकार माजला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काही बेड आरक्षित करून ठेवले आहेत. दरम्यान,  ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या ट्विटर हॅण्डलवरून उत्तर प्रदेशमधील कोरोनाच्या स्थितीबद्दलची बातमी देण्यात आली. या बातमीत लखनऊ प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी 1550 बेड (lucknow covid beds) आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोबत बेडचा फोटो देखील देण्यात आला.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर देखील अनेक युजर्सकडून हा फोटो लखनऊ मधील आरक्षित बेड्सचा (lucknow covid beds) म्हणून शेअर केला गेला. अशा प्रकारचे बेड्स आरक्षित केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जयजयकार केला जातोय.

पडताळणी:

सोशल मीडियावर लखनऊ मधील बेड्सचा म्हणून फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर काही युजर्सकडून या फोटोची सत्यता समोर आणण्यात आली. आम्हाला आम आदमी पक्षाचे मुख्य माध्यम समन्वयक विकास योगी यांचं एक ट्विट मिळालं.

योगी यांनी ‘आज तक’ची बातमी शेअर करत बातमी सोबत वापरण्यात आलेला फोटो दिल्ली सरकारच्या शाळेचा असल्याचं सांगितलं.

विकास योगी यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही काही किवर्डसह शोध घेतला असता आम्हाला दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अकाऊंटवरून १८ एप्रिल रोजी करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये सिसोदियांनी काही फोटोज शेअर करत दिल्लीतील राउज अवेन्यू परिसरातील शाळेला १२५ बेड्सच्या कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे.

मनीष सिसोदिया यांच्या ट्विटमधील फोटो आणि ‘आज तक’च्या बातमीमधील फोटो यांच्यामध्ये बरेच साधर्म्य आहे. फक्त दोन्ही फोटोज वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून घेण्यात आले आहेत. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीची अजून पुष्टी करण्यासाठी आम्ही किवर्ड सर्च केलं असता आम्हाला ‘आम आदमी पक्षा’च्या युट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आलेला  ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये देखील ‘राउज अवेन्यू’ परिसरातील दिल्ली सरकारच्या शाळेला कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आल्याची माहिती मिळते. शिवाय व्हिडीओवरून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो याच ठिकाणचा आहे, हे देखील स्पष्ट होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील कोविड सेंटरचा म्हणून शेअर केला जात असलेला फोटो वस्तुतः दिल्ली सरकारच्या एका शाळेचा आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारकडून या शाळेचं रूपांतरण १२५ बेड्सच्या कोविड रुग्णालयात केलं होतं.

हे ही वाचा- योगी सरकारने पसरवल्या ‘हार्वर्ड विद्यापीठा’ने उत्तम कामगिरीची दखल घेतल्याच्या चुकीच्या बातम्या!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा