Press "Enter" to skip to content

कानपुरमधील हिंसाचाराच्या घटनेचा म्हणून वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये लोकांची गर्दी बघायला मिळत असून ते इकडे तिकडे सैरावैरा पळताहेत. सोबतच दोन तरुण बंदुकीत काडतुसे भरताना देखील बघायला मिळताहेत. हा व्हिडीओ कानपुर येथील हिंसाचाराचा (Kanpur violence) असल्याचा दावा केला जातोय.

Advertisement

सुदर्शन न्यूजशी संबंधित रिपोर्टर संतोष चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता श्रमजीवी पत्रकार कल्याण एसोशिएशनच्या ट्विटर हॅण्डलवरून 10 मे 2021 रोजी हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. या ट्विटमध्ये धौरा तांडा या गावात गाईच्या मांसावरून हिंसाचार झाल्याचे सांगण्यात आले होते. सोबतच याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई केल्याची माहिती देखील देण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे किवर्डच्या साहाय्याने शोध घेतला असता ‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर 12 मे 2021 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार उत्तर प्रदेशातील बरेलीमधील भोजीपुरा येथील धौरा तांडा गावातील रहिवासी जलेश अहमद आणि सलीम कुरेशी यांच्यात वाद निर्माण झाला होता. लॉकडाऊनच्या दरम्यान गोवंशीय प्राण्यांचे मांस महाग विकण्याच्या कारणावरून हा विवाद निर्माण झाला होता.

bareli violence news screengrab 2021
Source: Amar Ujala

या प्रकरणात पोलिसांनी छोटन, रहीय अहमद आणि सलीमला अटक केली होती. शाहबान या व्यक्तीने गोमांस म्हणून पोलिसांकडे सादर केलेले मांस तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बरेली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देखील यासंबंधित व्हिडीओ जारी करण्यात आला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओचा कानपुर येथील हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. शिवाय व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा आहे.

हेही वाचा- कोलकात्यामधील हिंसाचारात दंगलखोरांनी घेतला पोलिसाचा जीव? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा