Press "Enter" to skip to content

हुंड्यासाठी लग्नास नकार देणाऱ्या नवरदेवाच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये लग्न मंडपाच्या स्टेजवर खुर्चीवर बसलेले जोडपे बघायला मिळतेय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक व्यक्ती स्टेजवर बसलेल्या तरुणाला तो लग्न न करण्याचं कारण विचारतोय. त्यावर स्टेजवरील मुलगा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने आपण लग्न करत नसल्याचे सांगतोय. रोख रक्कम,अंगठी आणि साखळीची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, असेही तो सांगतोय.

Advertisement

व्हिडिओमध्ये स्टेजवरील नवरदेवाच्या वेशातील तरुण सांगतोय की आपण सरकारी नोकरदार आहोत आणि वडीलही सरकारी शिक्षक आहेत. त्यावेळी शेजारी नवरीच्या वेशात बसलेली मुलगी मात्र मुलाच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या असल्याचे सांगतेय.

सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

लोकसत्ता, टीव्ही 9 मराठी आणि साम टीव्हीने यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

Groom canceling marriage coz of dowery viral video news in marathi media
Source: Loksatta/Saam/TV9Marathi

वस्तुस्थिती:

विक्रम मिश्रा या फेसबुक पेजवरून 23 फेब्रुवारी 2022 रोजी आणि ‘दिव्या विक्रम’ या फेसबुक पेजवरून 25 फेब्रुवारी 2022 रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. दोन्हीही पेज व्हिडीओ क्रिएटर असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘दिव्या विक्रम’ या फेसबुक पेजवर आम्हाला अशा प्रकारचे अनेक स्क्रिप्टेड व्हिडीओ बघायला मिळाले. उदाहरणादाखल अशाच एका व्हिडिओमध्ये नवरा मुलगा नशेत असल्या कारणाने नवरी मुलगी लग्नासाठी नकार देतेय. या व्हिडिओमध्ये देखील नवरा-नवरीच्या भूमिकेत तेच कलाकार दिसताहेत, जे सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये बघायला मिळताहेत.

FB page casting same couple in different scripts
Source: Facebook

‘दिव्या विक्रम’ फेसबुक पेज चालवणाऱ्या विक्रम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडीओ खऱ्या घटनेचा नसून स्क्रिप्टेड आहे. हा व्हिडीओ सामाजिक संदेश देण्याच्या उद्देश्याने बनविण्यात आला होता.

हेही वाचा- श्रमयोगी मानधन योजनेद्वारे दरमहा १८०० रुपये मिळविण्याच्या आमिषाने होईल फसवणुक! सावधान!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा