Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचे सांगण्यासाठी शेअर केला जातोय अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांचा व्हिडीओ!

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडून तिरंग्याचा अपमान केला जात असल्याचे सांगण्यासाठी (farmers disrespecting indian flag) सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

व्हिडिओमध्ये शीख युवकांचा एक समूह भारतीय तिरंग्याला पायाखाली चिरडताना दिसतोय. या समूहातील तरुणांच्या हातात खलिस्तानचे झेंडे आहेत आणि त्यांच्याकडून ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जाताहेत.

Advertisement

रिंकल पोसवाल या फेसबुक युजरकडून अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ जवळपास ८१ हजार युजर्सकडून शेअर केला गेलाय.

Posted by Rinkel Poswal on Tuesday, 26 January 2021

अर्काइव्ह पोस्ट

गिरीश भोसले यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “हेच ते बिचारे गरीब शेतकरी, ज्यांना मोदी सरकार थंडी, पावसात आंदोलन करायला लावते”

हेच ते बिचारे गरीब शेतकरी, ज्यांना मोदी सरकार थंडी, पावसात आंदोलन करायला लावते.

Posted by गिरीश भोसले on Wednesday, 27 January 2021

अर्काइव्ह पोस्ट

अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील हा व्हिडीओ शेअर केलाय. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये देखील कंगनाने पुन्हा एकदा दावा केलाय की आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावला. वस्तुस्थिती अशी की हे दावे चुकीचे असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘चेकपोस्ट मराठी’ने देखील या दाव्याची पडताळणी केलेली आहे.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओ व्यवस्थितरीत्या बघितला असता व्हिडिओच्या डाव्या बाजूला ‘amanvir_singh5’ नावाच्या युजर आईडीवरून हा व्हिडीओ अपलोड केला गेला असल्याचे लक्षात आले. 

आम्ही गुगल सर्चच्या मदतीने हा आयडी शोधला असता, हा ‘टिक-टॉक’ आईडी असून हे ‘टिक-टॉक’ अकाउंट चालवणारी अमनवीर सिंह ही व्यक्ती अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे समजले. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ संबंधित ‘टिक-टॉक’ युजरकडून दि. २५ जानेवारी म्हणजेच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडच्या एक दिवसापूर्वी अपलोड करण्यात आला असल्याचे देखील बघायला मिळाले.

अमनवीर सिंहने २५ जानेवारी रोजी अपलोड केलेला व्हिडीओ आपण येथे बघू शकता. या व्यक्तीने आपल्या ‘टिक-टॉक’ प्रोफाईलमध्ये ‘आम्ही आमचे स्वतःचे खलिस्तान राष्ट्र बनवू’ असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे.

Source: urlebird.com

अमनवीर सिंहचे ‘टिक-टॉक’ प्रोफाइल स्कॅन केले असता आम्हाला अजून एक व्हिडीओ मिळाला. २४ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने इतरांना विरोध प्रदर्शनासाठी ‘7609 विल्बर वे, सेक्रामेन्टो, सीए, 95828’ या ठिकाणी एकत्रित येण्याचे निमंत्रण दिले आहे. 

Source: urlebird.com

अमनवीर सिंहने विरोध प्रदर्शनासाठी एकत्रित येण्यासाठी ज्या ठिकाणचा पत्ता दिला आहे, तो आम्ही गुगलवर शोधला असता, हे ठिकाण अमेरिकेत असल्याचे समजले. यावरूनच हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडशी जोडून जो व्हिडीओ शेअर केला जातोय, तो भारतातील नसून अमेरिकेतील आहे. या व्हिडिओचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान (farmers disrespecting indian flag) केलेला नाही. व्हिडिओमध्ये तिरंग्याचा अपमान करताना दिसणारे लोक खलिस्तान समर्थक आहेत. त्यांचा दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- दिल्लीतील शेतकरी आंदोलन ‘खलिस्तानी’ लोकांनी ‘हाय जॅक’ केल्याच्या दाव्यात किती तथ्य?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा