Press "Enter" to skip to content

मुस्लिम विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या माथ्यावरील मुकुट उतरवून भारतमातेला हिजाब घातला? पढायला लावली नमाज?

सोशल मीडियावर लहान मुलांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुस्लिम मुले बघायला मिळताहेत. ती मुले भारतमातेची भूमिका साकारत असलेल्या मुलीच्या डोक्यावरील मुकुट काढून तीला हिजाब घालत असल्याचे दिसतेय. त्यानंतर भारतमातेसोबत नमाज पढली जात असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडीओ धार्मिक चिथावणीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘आज तक’च्या वेबसाईटवर 15 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार सदर व्हिडीओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या बाजार खाला भागातील शिशु भारतीय विद्यालयातील आहे.

बाजारखाला पोलीस ठाणे हद्दीतील मालवीय नगरात असलेल्या शिशु भारतीय विद्यालयात ‘भारत के चार सपूत’ या नावाच्या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकडून आपापसातील भांडणे टाळून सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश देण्यात आला होता. मात्र या नाटकातील काही भाग कापून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. अपूर्ण व्हिडिओच्या आधारे संभ्रम पसरविण्यात आला, अशी माहिती बाजारखालाचे एसएचओ विनोदकुमार यादव यांनी दिली आहे.

एसएचओ विनोद कुमार यादव यांनी सांगितले की, अद्यापपर्यंत शाळेकडून तक्रार मिळालेली नसली तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार असून आणि सायबर सेलच्या मदतीने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

लखनऊच्या पोलीस आयुक्तालयाकडून देखील यासंदर्भात ट्विटच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पडताळणी दरम्यान ‘द जामिया टाईम्स’चे संपादक अहमद खबीर यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला नाटकाचा संपूर्ण व्हिडिओ देखील बघायला मिळाला. मूळ व्हिडिओमध्ये बघायला मिळतेय की भारतमाता बनलेली मुलगी प्रथम हिंदूंसोबत पूजा पाठ करते. त्यानंतर मुस्लिम मुलांसोबत नमाज आणि ख्रिश्चन मुलांसोबत प्रार्थना देखील करते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. धार्मिक सौहार्दाचा संदेश देणाऱ्या मूळ नाटकाशी छेडछाड करून त्याआधारे धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय. लखनऊ पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओसासोबत केले जात असलेले दावे चुकीचे असल्याचे सांगतानाच यप्राकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘अपहेलिअन फेनॉमेना’मुळे 22 ऑगस्टपर्यंत हवामान अधिक थंड राहणार असल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा