Press "Enter" to skip to content

शिवलिंगावर पाय ठेवलेल्या तरुणाचा तीन वर्षे जुना फोटो सध्याचा म्हणून व्हायरल!

सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो जोरदार व्हायरल होतोय. फोटोमध्ये हा तरुण शिवलिंगावर पाय ठेऊन उभा असलेला बघायला मिळतोय. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहन केले जातेय.

Advertisement

प्रियंका तिवारी या युजरकडून ट्विट करण्यात आलेला हा फोटो 8 हजारांपेक्षा अधिक वेळा रिट्विट केला गेलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे, हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ट्विटरवर 2019 मधील एका ट्विटमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. त्यावेळी हा फोटो आझमगढमधील असल्याचे सांगण्यात आले होते. 

आम्हाला याच ट्विटच्या रिप्लायमध्ये आझमगढ पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आलेली प्रतिक्रिया बघायला मिळाली. आझमगढ पोलिसांच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की सायबर सेलच्या तपासात समोर आले आहे की सोशल मीडियावर शिवलिंगावर पाय ठेवलेल्या मुलांचे नाव ऋषी कुमार आणि नीरज कुमार आहे. हे दोघे कोर्झा (हरिजन बस्ती) पोलीस स्टेशन, आलापूर जिल्ह्यातील आंबेडकर नगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येत आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो सध्याचा नसून तीन वर्षांपूर्वीचा आहे. फोटो उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर मधील आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- गणपतीची चित्रे छापलेली चप्पल कोणत्या कंपनीने बनवली? तिचे पुढे काय झाले?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा