सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की हा फोटो भारत आणि चीन यांच्यामधील सैन्य संघर्षाचा आहे. अरुणाचलमध्ये झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराने (Indian Army) 150 हून अधिक चिनी सैनिकांना कैद केले. शिवाय चिनी सैन्य कमांडर आणि भारतीय कमांडर यांच्यातील बैठकीनंतर देखील बंदिस्त करण्यात आलेल्या चिनी सैनिकांना सोडण्यात आले नाही.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही भारतीय सैनिकांनी 150 पेक्षा अधिक सैनिकांना ठार केल्याच्या माहितीची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा प्रकारच्या घटनेची माहिती देणाऱ्या कुठल्याही बातम्या आम्हाला बघायला मिळाल्या नाही.
व्हायरल फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला काही पोर्टल्सवर डिसेंबर 2020 पासूनच्या बातम्या आणि लेखांमध्ये हा फोटो बघायला मिळाला. या रिपोर्टमधील माहितीनुसार गलवान व्हॅलीमध्ये (Galwan Valley) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर चित्रपटाची निर्मिती केली जात असून सदर फोटो याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे.
व्हायरल फोटो संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे अजून शोध घेतला असता आम्हाला युट्युबवर या चित्रपटासंदर्भातील व्हिडीओ मिळाला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार व्हिडीओ ‘एलएसी’ चित्रपटाच्या (L.A.C)शूटिंग दरम्यानचा आहे. हा चित्रपट लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांमधील हिंसक चकमकीविषयी आहे. अभिनेते राहुल रॉय (Rahul Roy) हे या चित्रपटातील मुख्य भूमिकेत आहेत.
व्हिडिओमधील ५ मिनिटे ४८ सेकंदांपासून आपण हे दृश्य बघू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर भारतीय सैन्याने पकडलेल्या चिनी सैनिकाचा म्हणून शेअर केला जात असलेला फोटो गलवान संघर्षावर आधारित ‘एलएसी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. भारतीय सैन्याने 150 पेक्षा अधिक चिनी सैनिकांना कैद केले असल्याच्या दाव्यांना कुठलाही आधार नाही.
हेही वाचा- आर्यन खान ड्रग केस प्रकरणी अटक झालेल्यांमध्ये सर्व मुले मुस्लीम आणि मुली हिंदू आहेत? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment