Press "Enter" to skip to content

संविधान बदलण्याची भाषा करणारा व्यक्ती प. बंगालमधील मुस्लीम आमदार नाही!

पश्चिम बंगाल निवडणूक होऊन गेली तरी त्याविषयीच्या व्हायरल दाव्यांना खंड पडताना दिसत नाही. सोशल मीडियात एका मुस्लीम नेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत दिसणारा हा नेता मोदी-शहा यांना धमकावत संविधान बदलण्याचे वक्तव्य करत असल्याचे दिसते आहे. दावा केला जातोय की हा व्यक्ती पश्चिम बंगालमधील मुस्लीम आमदार (west bengal muslim mla) आहे.

Advertisement

‘बंगाल जीतने के बाद हरे टिड्डों का खेला शूरूमोदी और योगीको गाली देने वाले हिन्दू, ध्यान से सुनेंये मुस्लिम लीडर खुलेआम कह रहे है कि जिस दिन सत्ता मिलेगी!डाँ. बाबासाहेब भीमराव अंबेडकर द्वारा लिखा संविधान भी पलट देंगे और शरिया कानून लाएंगे!गौर से सुन लो, जातिवाद के नाम पर अपनी ही कब्र खोदने वालों!’

या अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

बंगाल जीतने के बाद हरे टिड्डों का खेला शूरूमोदी और योगीको गाली देने वाले हिन्दू, ध्यान से सुनेंये मुस्लिम लीडर खुलेआम कह रहे है कि जिस दिन सत्ता मिलेगी!डाँ. बाबासाहेब भीमराव अंबेडकर द्वारा लिखा संविधान भी पलट देंगे और शरिया कानून लाएंगे!गौर से सुन लो, जातिवाद के नाम पर अपनी ही कब्र खोदने वालों!👇👇

Posted by नटखट मोदी भक्त on Monday, 17 May 2021

अर्काइव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी हा व्हिडीओ अशाच काहीशा दाव्यांसह व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिलं आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स यांडेक्स रिव्हर्स ईमेजसर्चद्वारे शोधून पाहिल्या. त्यानुसार काही ट्विट्स आणि युट्युब व्हिडीओज सापडले.

हा व्हिडीओ २० डिसेंबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आला आहे. यासोबत वापरलेल्या हॅशटॅग्समध्ये #CAA #CitizenshipAmendmentAct असा उल्लेख आहे.

त्याच काळातल्या १९ डिसेंबर २०१९ रोजीच्या फेसबुक पोस्टमध्ये सदर व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

‘ये सुनो मुस्लिम समाज का जिला सदर खान सेद खान डॉ भीमराव अम्बेडकर का संविधान पलटने की चेतावनी देता हुआ प्रतापगढ़ – राजस्थान । ज्यादा से ज्यादा शेयर करो इनकी मानसिकता।’

ये सुनो मुस्लिम समाज का जिला सदर खान सेद खान डॉ भीमराव अम्बेडकर का संविधान पलटने की चेतावनी देता हुआ प्रतापगढ़ – राजस्थान । ज्यादा से ज्यादा शेयर करो इनकी मानसिकता।

Posted by Sohan Lal Aanjana on Thursday, 19 December 2019

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओ सोबतच्या कॅप्शनमधील दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती पश्चिम बंगाल निवडणुकीत जिंकलेला मुस्लीम नेता (west bengal muslim mla) नाही. तो व्हिडीओ १ वर्षापूर्वीचा आहे. CAA. NRC च्या अनुषंगाने देशात वातावरण तापले होते, त्याच वेळचे हे वक्तव्य आहे.

त्या वेळच्या फेसबुक पोस्ट नुसार व्हिडीओतील व्यक्ती राजस्थानच्या प्रतापगडची असावी. ती व्यक्ती आणि ठिकाण याविषयी आमच्या हाती ठोस पुरावा हाती लागला नाही परंतु हे मात्र खरे की याचा संबंध पश्चिम बंगाल निवडणुकांशी अजिबात नाही.

हेही वाचा:

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा