Press "Enter" to skip to content

‘5G’ टेस्टिंगमुळे शेकडो पक्षांचा मृत्यू झाल्याचे सांगत व्हायरल होतोय अनेक वर्षांपूर्वीचा फोटो!

5G नेटवर्क विषयी सोशल मीडियात नाना तर्हेचे फेक दावे व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक दावा म्हणजे ‘5G’ टेस्टिंगमुळे शेकडो पक्षी मेले (5g testing bird die). या दाव्याच्या पुष्टीसाठी सोशल मिडीयावर शेकडो पक्षी मरून पडल्याचा एक फोटो व्हायरल होतोय.

Advertisement

कॉंग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचे पुत्र खासदार नकुल नाथ यांच्या नावे असलेल्या फेसबुक पेजवरून ‘जब हमारा काम 4g से चल रहा है तो क्यों 5g टेस्टिंग करके इन बेज़ुबान पक्षी की जान के दुश्मन बन रहें हो’ या कॅप्शनसह व्हायरल फोटो पोस्ट केलाय.

या पोस्टला बातमी करेपर्यंत जवळपास ४ हजार लोकांनी शेअर केले होते.

जब हमारा काम 4g से चल रहा है तो क्यों 5g टेस्टिंग करके इन बेज़ुबान पक्षी की जान के दुश्मन बन रहें हो😔😔😔

Posted by Super MP on Wednesday, 5 May 2021

अर्काईव्ह लिंक

पडताळणी:

5G नेटवर्कमुळे कोरोना व्हायरस पसरतो, लहान मुलांना धोका निर्माण होतो अशा दिशाभूल करणाऱ्या फेक दाव्यांचे ‘चेकपोस्ट मराठी’ने या आधीच पुराव्यानिशी फॅक्ट चेक केलं आहे. पाहूयात ‘5G’ ने पक्षी मरत असल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे.

  • तो व्हायरल फोटो आताचा नाही

व्हायरल फोटो आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता २०१६ साली चेन्नईमध्ये उष्माघाताने अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल झाल्याचे आढळले. याच दाव्यांची पडताळणी करणारा २१ एप्रिल २०१६ रोजी ‘The News Minute’ने रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.

या रिपोर्टनुसार वन्यजीव संरक्षक श्रवण कृष्णन यांनी असा काही प्रकार चेन्नई मध्ये घडला नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या माहितीनुसार सदर फोटो तेथून ७ वर्षांपूर्वी बिहार मध्ये रासायनिक कीटकनाशकांचा मारा झालेले धान्य खाल्ल्याने मृत्यू झालेल्या पक्षांचा आहे.

The news minute ss about died birds
Source: The news Minute
  • ‘5G नेटवर्क’ मुळे पक्षांचा मृत्यू होतो का?

फोर्टिस मेमोरियल रिसर्चच्या रेडीओलॉजी विभागाचे सहसंचालक डॉ. राधा कृष्णन वर्मा यांच्याशी सदर विषयावर ‘द क्विंट‘ने बातचीत केली असता ते म्हणाले की

“5G रेडीएशन्सचा पक्षांवर याचा थेट परिणाम होत नाही परंतु त्यांच्या प्रजनन यंत्रणेवर किंवा रोगप्रतिकारक यंत्रणेवर याचे अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. परंतु असे काही परिणाम होण्याचे कोणतेही पुरावे अजून उपलब्ध नाहीत. ”

– डॉ. राधा कृष्णन वर्मा

‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स’ च्या संशोधन समन्वयक रीतेका सूद यांनीही 5G रेडीएशनमुळे पक्षांना फ्ल्यू होत असल्याचे अमान्य केले.

“बर्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. हा संसर्ग पसरवणारा एजंट 3 जी, 5 जी इत्यादी सारख्या रेडिओ लहरींनी पसरत नाही. त्यामुळे पक्षी अशा कुठल्या किरणांमुळे बर्ड फ्ल्यू होतो आणि ते मरतात यास काहीच तथ्य नाही. ”

– रीतेका सूद

‘International Commission on Non-Ionizing Radiation Protection’ या संस्थेचे प्रमुख आणि नेदरलँड हेल्थ कौन्सिलचे सदस्य डॉ. एरिक वॅन रोंगेन यांनी २०१८ साली स्नोप या फॅक्ट चेक वेबसाईटसोबत बोलताना महत्वाचा मुद्दा मांडला होता. ते सांगतात-

“इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आल्यामुळे पक्षांचा मृत्यू होण्याची जर कल्पना करायची असेल तर त्यासाठी त्या फिल्डमधील किरणांमुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण व्हावी लागेल. पण ज्या पातळीत मोबाईल नेटवर्कसाठीची किरणे वापरली जातात ती एवढी उष्णता निर्माण करू शकत नाहीत.”

– डॉ. एरिक वॅन रोंगेन

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की ‘5G’ टेस्टिंगमुळे शेकडो पक्षांचा मृत्यू (5g testing bird die) झाल्याचे सांगत व्हायरल होत असलेला फोटो आताचा नाही. तो जवळपास १२ वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. तसेच ‘5G’ नेटवर्कच्या रेडीएशन्समुळे पक्षांना फ्ल्यू होतो किंवा त्यांचा मृत्यू होतो या दाव्यांना संशोधनाच्या दृष्टीने कुठलाही सबळ पुरावा नाही.

हे ही वाचा: देशी दारूने कोरोनावर इलाज केल्याचे सांगणाऱ्या बोधेगावच्या डॉक्टरांचे दावे दिशाभूल करणारे!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा