Press "Enter" to skip to content

राज्यसभेचे कॉंग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी ‘मुस्लिमांनी मरण्यापूर्वी ५-६ हिंदू मारावेत’ असा सल्ला दिल्याचे दावे फेक!

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी कॉंग्रेस पक्षाने इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांना उमेदवारी जाहीर केलीय. याच इम्रान प्रतापगढी यांनी ‘मुस्लिमांनी मरण्यापूर्वी 5-6 हिंदू माणसे मारून मरावे’ असा सल्ला दिला होता, अशा प्रकारचे दावे सोशल मीडियात व्हायरल होताहेत.

Advertisement

“मुस्लिमांनी मरण्यापूर्वी ५/६ हिंदू माणसे मारून मरावे” असा सल्ला देणाऱ्या इम्रान प्रतापगढी या नालयकाला काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.*
तरीही काही गांधी घराण्याची गुलामी करण्यात गुंग असतील तर हिंदूंचा नाश अटळ आहे.’ अशा प्रकारच्या मजकुरासह फोटोज व्हायरल होतायेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील अनगळ यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर ‘forwarded many times’ च्या टॅगखाली व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने इम्रान प्रतापगढी यांनी अशा प्रकारे धार्मिक सलोखा नष्ट होईल असे काही वक्तव्य केले आहे का? त्यावर काही कारवाई झालीय का हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी बघायला मिळाली नाही. परंतु उजव्या विचारसरणीच्या ‘ऑपइंडिया’ नामक पोर्टलवर या दाव्यांप्रमाणेच एक बातमी आम्हाला मिळाली.

‘Muslims must kill 4-6 persons before dying’: Congress’ new minority cell head Imran Pratapgarhi and his hate-filled ‘shayari’. अशा मथळ्याखाली ती १८ जून २०२१ रोजीची बातमी आहे.

Source: OpIndia

हे वक्तव्य नेमके का आणि कधी केले हे तपासण्यासाठी आम्ही संपूर्ण बातमी वाचली तेव्हा त्यात एक व्हिडीओ आम्हाला सापडला. पेशाने शायर-कवी असणाऱ्या इम्रान प्रतापगढी यांनी मॉब-लीन्चिंगच्या संदर्भाने सादर केलेल्या कवितेतील ओळी खालीलप्रमाणे:

"अरे इमानवालो जुमलको ललकार कर मरना
कभी गर भेडीयोका झुंड तुमको घेर ले तो
अगर मरना पडे तो चार-छे को मार कर मरना"

या ओळींत कुठेही हिंदू मुस्लीम असा उल्लेख नाही. मुळात कवितेचा, शायरीचा शब्दशः अर्थ घेणे देखील अजिबात शहाणपणाचे नाही. शिवाय या ओळींचा शब्दशः अर्थ लावणे म्हणजे एका अर्थी हिंदूंकडून मुस्लिमांची मॉब-लिंचिंग केली जात असल्याचा स्वीकार करण्यासारखेच आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की कॉंग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलेले शायर इम्रान प्रतापगढी यांनी ‘मुस्लिमांनी मरण्यापूर्वी ५-६ हिंदू माणसे मारून मरावे’ असा सल्ला दिल्याचे दावे फेक आहेत. ज्या कवितेचा उल्लेख ऑपइंडियाच्या बातमीत केलेला आहे त्यामध्ये कुठेही हिंदू मुस्लीम अशा धर्मांचा उल्लेख नाही.

हेही वाचा: संघाने भारताचे नवे संविधान लिहून प्रसिद्ध केले? वाचा व्हायरल ‘पीडीएफ’चे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा