Press "Enter" to skip to content

‘ती मी नव्हेच’ पद्मशीला तिरपुडे यांचे व्हायरल पोस्ट्सबद्दल स्पष्टीकरण!

गेल्या दोन दिवसांपासून काही फोटोज आणि मेसेजेस व्हायरल होताहेत. खलबत्ते, वरवंटे विकून एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या पद्मशीला तिरपुडे (Padmashila Tirpude) यांच्या यशोगाथेबद्दल सोशल मिडीयावर चर्चा आहे.

Advertisement

कमरेवर लहान मूल अन् डोक्यावर खलबत्ता, वरवंटा घेतलेल्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. खडतर परिस्थितीला सामोरं जात फोटोतील स्त्रीने आपले PSI होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचं या फोटोंसह सांगण्यात येतंय.

काय आहे व्हायरल मेसेज?

नाव: पद्मशीला तिरपुडे

जिल्हा: भंडारा.

खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे.

💐 सलाम तिच्या मेहनतीला 💐

https://www.facebook.com/nagvanhsinetwork358/posts/202881314542440

अर्काइव्ह लिंक

https://www.facebook.com/105614244263927/posts/205637014261649/?app=fbl

फेसबुकवर या पोस्ट किती मोठ्या प्रमाणात शेअर झाल्या आहेत हे पहायचे असल्यास सर्च बार मध्ये ‘पद्मशीला तिरपुडे’ असे नाव टाकून फोटो सर्च करा. आश्चर्य वाटेल. एवढ्या मोठ्या संख्येत पोस्ट्स दिसतील.

Padmashila Tirpude success story shared on facebook
Source: Facebook

सदर व्हायरल पोस्ट्स बद्दल ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अल्ताफ शेख, राजू खैरनार आणि उमेश परब यांनी पडताळणी करण्याची विनंती केली आहे.

पडताळणी:

परिस्थिती कशीही असली तरी अपार कष्ट करत ध्येय गाठणाऱ्या ध्येयवेड्यांचे समाजात नेहमीच कौतुक केले जाते. त्यांच्या पासून प्रेरणा देखील घेतली जाते. अशातच सोशल मीडियावर ‘पद्मशीला तिरपुडे’ (Padmashila Tirpude) या महिलेची यशोगाथा मोठ्या संख्येने व्हायरल होताना दिसतेय.

यशोगाथा खरी पण ६ वर्षे जुनी:

याविषयी पडताळणी केली असता व्हायरल यशकथा खरी असली तरी, ती आताची नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेज सर्चच्या आधारे शोधले असता, तिरपुडे यांच्या संदर्भातील आणखी काही पोस्ट आणि लिंक्स आम्हाला मिळाल्या. 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने २०१४ साली प्रकाशित केलेल्या यशोगाथा या नियतकालिकात तिरपुडे यांच्या संघर्षाची माहिती देणारा लेख प्रकाशित करण्यात आला होता.

YCOU Yashogatha booklet checkpost marathi

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या यशोगाथेतील मजकूर:

मूळ भंडारा जिल्ह्यातील वाळके जवळच्या पहेला गावातल्या पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी पद्मशीला रमेश तिरपुडे (Padmashila Tirpude) हिचा दहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही पद्मशिला  तिरपुडे यांनी  पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. या प्रवासात त्यांना त्यांचे पती पवन खोब्रागडे यांची मोलाची  साथ मिळाली.

लग्नानंतर मात्र औरंगाबादला येऊन रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र काही काळाने तेही सोडावे लागल्याने समोसे विक्रीचा व्यवसाय या जोडप्याने सुरू केला. हमाली करूनही मनासारखे उत्पन्न मिळत नसल्याने शेवटी त्यांनी नाशिक गाठले आणि तिथे गोदावरी नदीच्या काठावर पाल टाकून आपल्या संसाराला पुन्हा सुरळीत करण्यासाठी काम करणं सुरू केलं. याबरोबरच पद्मशीला यांनी मुक्त विद्यापिठाच्या माध्यमातून बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत शेवटी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. फौजदार झालेल्या पद्मशीला यांचे पहिले पोस्टिंग अमरावती जिल्ह्यात झाले होते.

पद्मशीला पाटे-वरवंटे विकायच्या?

तिरपुडे यांच्याविषयी सर्वच व्हायरल पोस्ट मध्ये त्यांनी खलबत्ता, वरवंटा विकून आपले ध्येय साध्य केल्याचं सांगण्यात येतंय. ते सांगण्यासाठी एक फोटोसुद्धा शेअर केला जातोय. मात्र ज्या मुक्त विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलंय, त्या विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या यशोगाथेत मात्र याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणून आम्ही पडताळणी केली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. शेवटी महराष्ट्र टाईम्सची बातमी आमच्या निदर्शनास आली.

यामध्ये त्यांनी “खलबत्ते विकणारी ती महिला ही मीच आहे, असे परस्पर ठरवून अनेकांनी माझा फोटो व्हायरल केला. कुठलीही खातरजमा न करता केलेली ही कृती पूर्णतः चुकीची आहे. यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. अजूनही त्रास होतोच आहे.” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Source: Maharashtra Times

वस्तुस्थिती:

सोशल मीडियातून व्हायरल होणारी पद्मशीला तिरपुडे यांची कहाणी खरी तर आहे, मात्र ही घटना आताची नसून २०१४ मधली असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी वरवंटे पाट्याची विक्री केली नाही असेही त्यांनी स्वतःच स्पष्ट केलेय.

व्हायरल पोस्टमध्ये तथ्यात्मक चुका असल्या तरीही आणि घटना जुनी असली तरीही पद्मशीला यांनी ज्या जिद्दीने आणि मेहनतीने यश खेचून आणले आहे त्यासाठी त्यांना ‘चेकपोस्ट मराठी’चा सलाम!

हेही वाचा: टँकरमधून महिला आणि बालकांची तस्करी चालू होती? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा