Press "Enter" to skip to content

याकुब मेमनची फाशी रद्द करण्यासाठी याचिका करणाऱ्यांची यादी म्हणून व्हायरल यादीतील ४० पैकी ३२ नावे फेक!

अरविंद केजरीवाल, शाहरुख खान, रविश कुमार, ओवैसी बंधू, ममता बॅनर्जी, दिग्विजय सिंह यांच्यासह ४० नावांची यादी सोशल मीडियात व्हायरल होतेय. दावा केला जातोय की याकुब मेमनची (Yakub Memon) फाशी रद्द होण्यासाठी राष्ट्रपतींना याचिका करणारे हेच ते लोक होते जे दहशतवादाला बढावा देत आहेत.

Advertisement

‘याकुब मेमन की फाँसी रुकवाने हिन्दुस्तान के जिन चालीस हस्तियों नें राष्ट्रपति को चिठ्ठी लिखी, उनके नाम –‘ अशी सुरुवात करून ४० नावांची यादी त्या व्हायरल पोस्टमध्ये आहे.

पुन्हा देवेंद्र पुन्हा नरेंद्र, केवल मोदी, वी सपोर्ट अमित शहा, मोदी है तो हिंदू है, गो रक्षा दल हरियाणा यांसारख्या फेसबुक ग्रुप्सवरून हे दावे व्हायरल होत आहेत. दिनेश मोकळ या फेसबुक युजरने सर्वात जास्त ग्रुप्सवर ही पोस्ट शेअर केलीय.

याकुब मेमन की फाँसी रुकवाने हिन्दुस्तान के जिन चालीस हस्तियों नें राष्ट्रपति को चिठ्ठी लिखी, उनके नाम —-01 – वृंदा…

Posted by Dinesh Mokal on Saturday, 3 July 2021

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अजीव पाटील आणि राजेंद्र काळे यांनी फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सऍपवर देखील ती यादी व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

 • १९९३ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आरोपी याकुब मेमन (Yakub Memon) याचा गुन्हा सिद्ध झाला आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली. परंतु देशातील काही महत्वाच्या व्यक्तींनी त्याची फाशी रद्द करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता.
 • ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी संबंधित कीवर्ड्सच्या आधारे गुगलसर्च केले. त्यानुसार याकुब मेमनची फाशी रोखण्यासाठी याचिका करणाऱ्यांविषयीच्या २०१५ सालच्या बातम्या आमच्या समोर आल्या. परंतु त्यात मोजक्याच याचिका कर्त्यांची नावे होती.
 • अधिक सखोल शोधाशोध केल्यानंतर ‘हफपोस्ट‘ आणि ‘द हिंदू‘ने प्रसिद्ध केलेली संपूर्ण २९१ याचिकाकर्त्यांची नावे आणि त्यांनी केलेला अर्ज आम्हाला मिळाला.
 • मानवाधिकाराच्या आंतरराष्ट्रीय तरतुदी, याकुब मेमनची पुराव्यानिशी सिद्ध झालेली २० वर्षांपासूनची स्मृतिभ्रंशाची मानसिक अवस्था यांचे दाखले देत फाशी रद्द होण्यासाठी याचिका करण्यात आली होती.
 • मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) आणि टायगर मेमन (Tiger Memon) फरार झाले परंतु थेट सूत्रधार म्हणून संबंध नसतानाही केवळ टायगर मेमनचा भाऊ म्हणून याकुब मेमनला फाशीची सजा देणे न्याय्य नाही, असे अर्जात नमूद केले आहे.
 • अर्जदारांत ८ निवृत्त न्यायाधीश, काही चित्रपट सृष्टी आणि राजकारणाशी संबंधित महत्वाच्या नागरिकांचा समावेश होता. अर्थात ही याचिका फेटाळून लावत ३० जुलै २०१५ रोजी फाशी देण्यात आली.
 • मूळ याचिका कर्त्यांच्या नावांची यादी आणि व्हायरल यादी एकमेकांशी जुळवून पाहिली असता असे लक्षात आले की व्हायरल यादीतील ४० पैकी तब्बल ३२ नावे फेक आहेत. मुस्लीम धर्मीय सेलिब्रिटी आणि मोदी-भाजप विरोधकांनी खच्चून भरलेली ही यादी आहे.
 • व्हायरल यादीतील फेक नावे:
 1. शाहरुख खान
 2. आमीर खान
 3. सैफ अली खान
 4. सलमान खान
 5. अरविंद केजरीवाल
 6. तिस्ता सितलवाड
 7. दिग्विजय सिंह
 8. लालू यादव
 9. नितीश कुमार
 10. अबू आजमी
 11. असदुद्दिन ओवैसी
 12. अखिलेश यादव
 13. आजम खान
 14. सचिन पायलट
 15. जर्नैल सिंह
 16. अलका लांबा
 17. आशुतोष
 18. सागरिका घोष
 19. करीना खान
 20. सानिया मिर्झा
 21. अकबरुद्दीन ओवैसी
 22. शाजीया इल्मी
 23. अहमद बुखारी
 24. अभय दुबे
 25. रविश कुमार
 26. पुण्यप्रसून बाजपेयी
 27. ममता बॅनर्जी
 28. सिद्धारामैया
 29. आशिष खेतान
 30. स्वामी अग्निवेश
 31. संजय सिंह
 32. शकील अहमद

वस्तुस्थिती:

याकुब मेमनची फाशी रोखण्यासाठी याचिका करणाऱ्यांची जी यादी सोशल मीडियात व्हायरल झालीय त्यातील ४० पैकी ३२ नावे फेक असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले.

मुस्लीम सेलिब्रिटी, सरकारला धारेवर धरणारे पत्रकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांना दहशतवाद्यांविषयी सहानुभूती असल्याचे चित्र उभे करण्यासाठी उजव्या विचारधारेच्या लोकांकडून अशा प्रकारचा दुष्प्रचार केला आहे.

हेही वाचा: भारताने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड निर्माण केल्याचे सांगणारे केंद्रीय मंत्र्यांचे दावे फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा