काल पुलवामा हल्ल्याला (Pulwama Attack) तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशाने पुलवामातील शहीद जवानांच्या स्मृती जागवत त्यांना आदरांजली वाहिली. याच दरम्यान सोशल मीडियावर एक 14 सेकंदांचा व्हिडीओ देखील व्हायरल व्हायला लागला. व्हिडीओ शेअर करताना दावा केला गेला की हा व्हिडीओ पुलवामा हल्ल्याचा आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावरील काही गाड्या दिसताहेत आणि अचानकच स्फोट झालेला बघायला मिळतोय.
पडताळणी
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘ट्रक बॉम्ब’ या शीर्षकासह साधारणतः 13 वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ इराकमधील आहे.
हाच व्हिडीओ यापूर्वी देखील अनेकवेळा पुलवामा हल्ल्याचा म्हणून व्हायरल झाला आहे. ‘बूम’च्या रिपोर्टनुसार व्हिडीओ इराकमधील बगदाद शहराजवळील कॅम्प ताजी येथील आहे. ताजी कॅम्पजवळ 2007 मध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता तर 7 जण जखमी झाले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर पुलवामा हल्ल्याचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ इराकमधील आहे. या व्हिडिओचा पुलवामा हल्ल्याशी काहीही संबंध नाही. शिवाय व्हिडीओ साधारणतः 13 वर्षांपूर्वीचा आहे.
हेही वाचा- योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीआधी चक्क पैसे वाटले? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment