Press "Enter" to skip to content

लीक होऊन सोशल मीडियात फिरत असलेलं ‘ते’ पत्र पंकजा मुंडे यांचंच !

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाने एक पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झालंय. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र व्हायरल झाल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जाताहेत. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि भाजपच्या गोटात उमेदवारी कोणाला मिळणार यावरून तर्क वितर्क व अंदाज बांधणीला सुरुवात झाली.

Advertisement

विधान परिषद २०२०च्या उमेदवारीसाठी मी इच्छुक असून मला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यासाठी ‘नो ड्युज सर्टिफिकेट’ मिळावं असा अर्ज करणारं हे पत्र पंकजा मुंडे यांनी लिहिलेलं आहे असं त्यातील मजकुरातून समजतं. अंतर्गत पत्रव्यवहाराचं, विनंती अर्जाचं ते पत्र लिक होऊन जगासमोर आल्याने फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडियामधून जोरदार फिरायला लागलं.

काय आहे नेमकं या पत्रात पहा तुम्हीच:

पडताळणी:

पत्रातील मजकूर वाचून कुणालाही हेच वाटण्याची शक्यता आहे की हा विरोधकांचा खोडसाळपणा आहे. कारण हे पत्र कुणासाठी लिहिलंय त्या व्यक्तीचे, संस्थेचे नाव यात नाही. हे पत्र पंकजा यांच्या अधिकृत लेटरहेडवर सुद्धा नाही. परंतु त्यावर सही असल्याने ते पूर्णपणे खोटं असल्याचा दावा देखील कुणी छातीठोकपणे करू शकत नाही. त्याचमुळे आम्ही आमचे संशोधन सुरु केले. यात आम्हाला पंकजा यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर या पत्रासंबंधी त्यांनी केलेले ट्विट सापडले.

ट्विटमध्ये त्या म्हणतात : “कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहे. माझ्या ई-मेलवरून माझ्या pa ने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला ते कोणी viral केलं बातमी झाल्यावर मला कल्पना आली स्पष्ट करत आहे” असे स्पष्टीकरण खुद्द पंकजा मुंडे यांनीच दिल्याचे आढळले. याचाच अर्थ असा की ते पत्र पंकजा मुंडे यांचंच असल्याचं खुद्द पंकाजा मुंडे यांनीच  मान्य केलं आहे.

वस्तुस्थिती:

पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पी.ए ने हे पत्र परस्पर विधानसभेतील मजकूर उतरवून तयार केलं असेल तर त्यावर पंकजा यांची सही कशी काय? ती सुद्धा त्यांच्या परवानगीविनाच घेतली असेल का? या अशा शंकांचं उत्तर  मात्र पंकजा मुंडे यांच्याकडेच असणार.

पंकजा यांच्या स्पष्टीकरणानंतर एक गोष्ट मात्र नक्की होते की ’ते’ पत्र हा विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याचा खोडसाळपणा नाही किंवा कुणी तयार केलेले बनावट पत्र नाही. सोशल मीडियात फिरत असलेलं लीक झालेलं ‘ते’ पत्र पंकजा मुंडे यांचंच आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून ‘चेकपोस्ट’वर आम्ही त्यास हिरवा कंदील देतोय.

हे ही वाचा- ‘कॉंग्रेसचे नेते एक महिन्याचे वेतन पीएम केअरला देणार’ -‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा